उद्या शपथविधी पाहा; मंत्रिपदासाठी आमदारांचे लॉबिंग,भाजप,शिंदे गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

Tomorrow's swearing-in ceremony: See the list of potential ministers from BJP and Shinde group

 

 

 

 

महायुती सरकारच्या शपथविधीला अवघे काहीच तास शिल्लक असताना आता भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोर आली आहे. त्यामध्ये आशिष शेलार, रविंद्र चव्हाण,

 

गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह निलेश राणे आणि गोपीचंद पडळकरांचाही समावेश असल्याची माहिती आहे. भाजपकडून एकूण 16 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

 

भाजपचे संभाव्य मंत्री
कोकण

रविंद्र चव्हाण
नितेश राणे
गणेश नाईक
मुंबई

 

 

मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
राहुल नार्वेकर
अतुल भातखळकर
(मंगलप्रभात लोढा यांना दिलं तर राहुल नार्वेकर नसतील.)
पश्चिम महाराष्ट्र

 

 

शिवेंद्रसिंहराजे भोसले
गोपीचंद पडळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखे पाटील

 

विदर्भ

चंद्रशेखर बावनकुळे
संजय कुटे

 

उत्तर महाराष्ट्र

गिरीश महाजन
जयकुमार रावल

 

मराठवाडा

पंकजा मुंडे
अतुल सावे

 

गेल्या काही तासांपासून एकनाथ शिंदे यांनी महायुतीसाठी चर्चेचे दरवाजे पुन्हा उघड केले आहेत. त्यामुळे वर्षा बंगल्यावरील घडामोडींना वेग आला आहे.

 

काहीवेळापूर्वीच संजय शिरसाट हे उदय सामंत यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. तिथून हे दोन्ही नेते वर्षा बंगल्यावर जातील.

 

तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी प्रदेश मुख्यालयात

 

शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला होता. प्रदेश मुख्यालयातील बैठकीनंतर फडणवीस यांच्या भेटीसाठी बावनकुळे दाखल झाले आहेत.

 

महायुतीच्या शपथविधीतही ‘एक है तो सेफ है’चा नारा दिसणार आहे. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात दहा हजार भाजप कार्यकर्ते ‘एक हैं तो सेफ हैं” आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट परिधान करणार आहेत.

 

महायुतीला विजय मिळवून दिलेल्या नाऱ्याची भाजपकडून पुनरावृत्ती करण्यात येणार आहे. तसेच शपथविधी काळात मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे
१) एकनाथ शिंदे
२) दादा भुसे
३) शंभूराज देसाई
४) गुलाबराव पाटील
५) अर्जुन खोतकर
६) संजय राठोड
७) उदय सामंत

 

मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदाची माळ यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला काही महत्त्वाची मंत्रि‍पदे दिली जातील.

 

आता मुख्यमंत्रि‍पदासाठीचं नाव जवळजवळ निश्चितच झाल्यामुळे आता नव्या सरकारमध्ये कोण-कोण मंत्री असणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे.

 

असे असतानाच आता शिवसेना पक्षात मंत्रि‍पदासाठी लॉबिंग चालू झाले आहे. सोबतच नाराजी टाळण्यासाठी मंत्र्‍यांपासून खात्यांबाबत गुप्तता पाळली जात आहे.

महायुतीमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेला चांगलाच वेग आला आहे. महायुतीतील घटकपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या रोज बैठका होत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातही मंत्रि‍पदासाठी अनेक नेते लॉबिंग करत आहेत.

 

शपथविधीसाठी आता 36 तासांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातही हालचाली वाढल्या आहेत. महत्त्वाचं खात आपल्या पदरात पडावं यासाठी शिवसेनेचे नेतेमंडळी प्रयत्न करत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षातील निवडक ज्येष्ठ मंत्र्‍यांना उद्या (5 नोव्हेंबर) मुंबईत राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांमधील नाराजी टाळता यावी यासाठी मंत्रि‍पदाबाबत गुप्तता पाळली जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षातून सात आमदारांची मंत्रि‍पदी वर्णी लागणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ मंत्र्‍यांना उद्या मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

 

यावेळी एकनाथ शिंदे काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. याआधीच्या सरकारमध्ये ज्या नेत्यांना मंत्रिपद दिलं होतं, अशा तीन नेत्यांना यावेळी मंत्रिपद दिलं जाणार आहे.

 

म्हणजेच मंत्री राहिलेल्या तीन बड्या नेत्यांचा पत्ता कट होणार आहे. त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळवीर मंत्र्‍यांना एकनाथ शिंदे नारळ देण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. येथे महायूतीच्या शपतविधीसाठी मुंबई पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

 

शपथविधी सोहळ्यादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडीच हजारहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

शपथविधीदरम्यान 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 150 सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *