उद्धव ठाकरेंना मोदी म्हणाले नकली शिवसेना,पाहा ठाकरेंनी काय दिले उत्तर?
Modi called Uddhav Thackeray a fake Shiv Sena, see what Thackeray replied?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये उपस्थिती दर्शवत सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसबरोबर आहे तेी नकली शिवसेना आहे
असं म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. तसंच नकली शिवसेनेचे लोक महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांना आणून रॅली कढाताना दिसत आहेत असं म्हटलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरादर प्रत्युत्तर दिलं आहे.
“काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले मोदी देशात जिथे कुठे जातात तिथे काश्मीरबाबत का बोलतो? हा फाळणीचा विचार नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीविरोधात भूमिका घेतली तेव्हा
ते म्हणाले का दिल्लीत जे होतंय त्याचा माझा काय संबंध? लोकमान्य टिळक म्हणाले होते का की जालियनवाला बाग हत्याकांड आणि माझा काय संबंध?
काश्मीरमध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांची घरं जाळण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या विरोधात उभे राहात भूमिका घेतली होती.
त्यावेळी बाळासाहेब ठाकरे असं नाही म्हणाले की काश्मीरमध्ये आग लागली आहे तर महाराष्ट्रातल्या लोकांचा काय संबंध? काँग्रेससह आहे ती नकली शिवसेना आहे.
मला आनंद आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहेत.” असं मोदींनी म्हटलं होतं. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी सविस्तर उत्तर दिलं आहे.
“एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगतो, महाविकास आघाडी व्यापक कशी होईल याचे आटोकाट प्रयत्न आम्ही केले. माझ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो की एकही जागा न मागता ही ताकद उभी केली
आणि ताकद जोडली. एकही जागा न मागता अनेकांनी भूमिका स्वीकारली. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येतील असं वाटलं होतं. दुर्दैवाने ते शक्य झालं नाही.
त्यामुळे गेल्या आठवड्यात ही भूमिका जाहीर केली होती, की प्रकाश आंबेडकर काहीही बोलले तरीही आम्ही उत्तर देणार नाही.
प्रकाश आंबेडकरांनी संविधान रक्षणासाठी दिलदारी दाखवायला हवी. भविष्यात काय होतं पाहू” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“सोमवारी एक विचित्र योग होता. सूर्यग्रहण होतं, अमावस्या होती आणि यांची (पंतप्रधान मोदी) सभा होती. असा विचित्र योग देशात पहिल्यांदाच होता.
यापुढे मी प्रसारमाध्यमांना मुद्दामहून सांगणार आहे. सोमवारी जे भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं. शिवसेना प्रमुख ज्यांना कमळाबाई म्हणायचे त्या पक्षाला मी भेकड,
भाकड, भ्रष्ट जनता पक्ष म्हणतो. त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी बोलले. निवडणूक प्रचार पंतप्रधान एका पक्षाचा करत असतील तो घटनेवर हात ठेवून
घेतलेल्या शपथेचा भंग होतो. त्यामुळेच मला वाटतं की सोमवारचं नरेंद्र मोदींचं भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं. कारण ते अध्यक्षही नाहीत.”
आम्ही जे उत्तर यापुढे देऊ ते कृपा करुन पंतप्रधानांना दिलं आहे असं कुणी समजू नये. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडून होणं शक्य नाही.
आमचे राजकीय विरोधक आहेत त्यात भेकड जनता पक्ष आहे. कारण शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करुन हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत. धाडी टाकत आहेत.
यांच्यात ताकद नाही म्हणून यांना मी भेकड म्हटलं.” पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “मी यांना भाकड म्हणतो कारण यांच्याकडे नेता कुणी निर्माण झालेला नाही.
विचारांचा आदर्श हे देऊ शकलेले नाही. भ्रष्ट तितुका मेळवावा आणि भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांचं धोरण आहे. एनडीए ही ताकदवान आघाडी होती आता हा ती ठिगळांचा पक्ष झाला आहे.” असं जोरदार प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्यावेळी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदी हिमालयात असतील,
मला कल्पना नाही. आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्रातल्या बाहेरच्या माणसाने येऊन असली सेना आणि नकली सेना कुठली हे सांगायचं म्हणजे कहर झाला.
यांचा पक्ष खंडणीखोर पक्ष आहे. चंदा दो आणि धंदा लो असं धोरण आहे. निवडणूक रोख्यांच्या विषयातून सगळं समोर आलं आहे. मुंबईत पूर्वी असं एक वातावरण होतं की मारुती वन थाऊजंड गाडी कुणी घेतली की
त्याला खंडणीचे फोन यायचे. त्याच्याकडून खंडणी उकळली जायची. तसं हे खंडणीचं केंद्र झालं आहे. अशा या खंडणीखोर पक्षाचे नेते शिवसेनेला नकली ठरवून गेले.
त्यांना मला सांगायचं आहे की कृपा करुन इतिहासाचा अभ्यास तपासून बघा. २०१९ मध्ये तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह हे मातोश्रीवर आले होते,
बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोपुढे त्यांनी लोटांगण घातलं होतं. त्यावेळी मी होतो आणि आमची हीच शिवसेना होती. तुम्हाला (नरेंद्र मोदी) जरी तो विसर पडलेला असला तरीही महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही.
खंडणीखोर पक्षाच्या नेत्याने शिवसेनेला असं म्हणणं योग्य नाही. यांना शिवसेनाही गुजरातला पळवायची होती. ती मी पळवू दिली नाही म्हणून
त्यांच्याबरोबर जो चायनीज माल बसला आहे त्यातच ते सुख मानत आहेत. त्यांचं सुख त्यांना लखलाभ असं प्रदीर्घ प्रत्यु्त्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.