बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणावरून छगन भुजबळांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका
Chhagan Bhujbal criticizes Chief Minister Shinde over Baba Siddiqui's murder case
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळीबार करण्यात आला.
या घटनेमध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. काल रात्री 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली.
या प्रकरणावर आता राजकीय नेत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे, त्याचबरोबर आता सत्ताधारी नेत्यांनी देखील सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी याप्रकरणी भाष्य केलं आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील आहे, असं देखील मंत्री छगन भुजबळ म्हणालेत.
नाशिकच्या येवल्यामध्ये माध्यमांशी बोलताना भुजबळांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, बाबा सिद्दीकी यांना अनेक वर्षापासून ओळखत होतो.
त्यांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना वाय सुरक्षा सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, त्यांना सुरक्षा देऊन देखील काही होत नाही. धमक्या आल्या होत्या तर काळजी घेतली पाहिजे होती.
धमकी कोणी दिली होती याचा देखील तपास करायला पाहिजे होता. ही घटना घडली त्यावेळी पोलीस काय करीत होते?, असा सवाल उपस्थित करत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.
आमच्या भायखळा येथील तालुका प्रमुखांची देखील निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मुंबई पोलिसासाठी हे एक चॅलेंज आहे. 10 ते 20 हजारात ही पोरं हत्या करत आहेत.
ही कॉन्ट्रकट किलिंग आहे. पोलिसांना फ्री हॅन्ड दिलं पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील आहे, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र पोलिसांचे मोठे नाव आहे. ते खराब होवु नये. लवकरात लवकर आरोपींना शिक्षा व्हावी. गृहमंत्री काही बोलायला तयार नाहीत. पोलिसांच्या मागे गृहमंत्री, सरकार यांनी उभे राहिले पाहिजे.
पोलिसांचं धैर्य वाढवलं पाहिजे. यात कुठेही राजकारण नाही. असा काही इतिहास नाही, की कोणी काँग्रेस सोडून गेल्यावर त्याची हत्या झाली. खंडणी, किंवा व्यवहार यातून ही हत्या झाली असावी. ही कॉन्ट्क्ट किलिंग आहे.
पोलिसांना फ्री हॅन्ड दिले पाहिजे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर झाला पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा मिळाली मिळाली पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील आहे, असंही पुढे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.