महराष्ट्रात राहुल गांधींना बॉम्बने ठार मारण्याची धमकी;एकाला अटक
Threat to kill Rahul Gandhi with a bomb in Maharashtra; one arrested

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणे बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नाशिक पोलिसांच्या माहितीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ८ दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांना फोनद्वारे मिळाली होती माहिती.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हल्ला होईल, असा नाशिक पोलिसांना फोन आला होता. दरम्यान फोन करणारा व्यक्ती माथेफिरू असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये ८ दिवसांपूर्वी अज्ञाताने फोन केला होता. या अज्ञाताने राहुल गांधी यांच्या हत्येचा कट रचल्याची बतावणी केली होती.
त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सर्व पोलीस यंत्रणांना अलर्ट करण्यात आलं. एटीएसची मदत घेण्यात आली होती.
त्यानंतर फोन केलेल्या अज्ञाताचा शोध सुरू झाला. ती व्यक्ती गंगापूर भागात राहात असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलिसांनी लगेचच त्याला ताब्यात घेतलं.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता तो मोथेफीरू असल्याचं समोर आलं आहे. दारूचं व्यसन जडलं आहे. मानसिक वैफल्यातून त्याने हा फोन केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
तरीही संबंधित व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे. खबरदारी म्हणून मोथेफीरूवर नजर ठेवण्यात आलं आहे. तसंच संबंधित यंत्रणांनाही याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
राहुल गांधी संध्या भारत जोडो न्याय यात्रेत व्यस्त आहेत. संपूर्ण भारतात त्यांचा दौरा सुरू आहे. या न्याय यात्रेला मोठी गर्दीही होत आहे.
त्यामुळे या गर्दीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने राहुल गांधींची सुरक्षा वाढवल्याची माहिती आहे. तसंच त्याच्या निवासस्थानाबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.