मुख्यमंत्री ममता ब्यानर्जी अपघातात जखमी ;पाहा VIDEO

Chief Minister Mamata Banerjee injured in accident

 

 

 

 

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचारादरम्यान किरकोळ दुखापत झाली आहे. ममता बॅनर्जी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुर्गापूरमध्ये आल्या होत्या.

 

 

 

 

 

तेथून त्या इतर ठिकाणी एका सभेसाठी हेलिकॉप्टरमधून जाणार होत्या. ममता हॅलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी पायऱ्या चढत असताना

 

 

 

त्यांचा पाय निसटला अन् त्यांचा तोल गेला. त्या समोरच्या बाजूला पडल्या. या अपघातात त्यांना किरकोळ जखम झालीये.

 

 

 

यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, ममता या हेलिकॉप्टरच्या दिशेने जातात. हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी त्या पायऱ्या चढत असतात,

 

 

 

अचानक त्यांचा पाय निसटला अन् त्यांचा तोल गेला. त्या हेलिकॉप्टरमधील समोरच्या सीटवर पडतात. त्याठिकाणी उपस्थित सुरक्षा कर्मचारी त्यांना सांभाळतात. यात ममतांना किरकोळ दुखापत झाल्याचं समजतंय.

 

 

 

 

दरम्यान, ममता यांचा दीड महिन्यांपूर्वीच एक अपघात झाला होता. यात त्या जखमी झाल्या होत्या. रिपोर्टनुसार, ममता बॅनर्जी या घरात पडल्या होत्या.

 

 

 

 

अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ११ मार्च रोजीची ही घटना आहे. त्यानंतर आता ४४ दिवसांनी ममता पुन्हा जखमी झाल्या आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *