तेलंगणात विधानसभेसाठी उद्या मतदान
Assembly polls tomorrow in Telangana

तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास पावणे दोन महिने सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावल्या. उद्या ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून
२२९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. ३ कोटी २६ लाख १८ हजार मतदारांच्या हातात या उमेदवारांचे भवितव्य असणार आहे. ३ डिसेंबरला मजमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली होती. मिझोराम, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या चार राज्यांच्या तुलनेत तेलंगणाचा निवडणुकीचा काळ खूप मोठा होता.
या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती तिसऱ्यांदा सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काँग्रेसने पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रचार केला आहे. भाजपनेही तेलंगणाच्या प्रचारात पंदप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा, रोड शो चे आयोजन केले होते.
निवडणुकीत बीआरएस प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर), त्यांचे पुत्र केटी राव, तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी, भाजपचे खासदार बंदी संजय कुमार, डी. अरविंद आणि सोयम बापूराम यांच्यासह २२९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
केसीआर कामरेड्डी आणि गजवेलमधून निवडणूक लढवणार आहेत. तर रेवंत रेड्डी कोडंगल आणि कामरेड्डीमधून निवडणूक लढवणार आहेत.
भाजपने आमदार एटाळा राजेंद्र यांना हुजूराबाद व्यतिरिक्त गजवेलमधून उमेदवारी दिली आहे. याच मतदार संघातून ते गेल्या निवडणुकीत निवडून आले होते. दरम्यान सोमवारी निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये रोड शो केला.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी ३ कोटी २६ लाख १८ हजार २०५ मतदार मतदान करणार आहेत. त्यामध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे. १ कोटी ६२ लाख ९८ हजार ४१८ पुरुष मतदार आणि १ कोटी ६३ लाख १ हजार ७०५ महिला मतदारांची संख्या आहे.
तर २ हजार ६७६ तृतीयपंथी मतदारांची नोंदणी आहे. निवडणुक रिंगणात उतरलेल्या २२९० उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती असून मतपेढीत बंद होणार आहे.