माजी राज्यपाल कोश्यारींनी अंबानींकडून १५ कोटींच्या देणग्या घेतल्याच्या निनावी पत्राने खळबळ

An anonymous letter of ex-governor Koshyari taking donations of 15 crores from Ambani caused excitement

 

 

 

 

 

राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या वादग्रस्त भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असायचे. त्यातच आता कोश्यारी यांनी

 

 

 

अनंत अंबानी यांच्याकडून देणग्या घेतल्या असल्याचं एक निनावी पत्र माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळाले आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

 

 

 

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपालपदाच्या कार्यकाळात त्यांच्या संस्थेला किती देणग्या मिळाल्या? याची माहिती मागवली होती.

 

 

 

मात्र ही माहिती राजभवनकडे नसल्याचे त्यांच्या कार्यालयाने सांगितले. पण एका बाजूला ही माहिती राजभवनकडे नसल्याचे सांगत असतानाच दुसऱ्या बाजूला माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना एक निनावी पत्र मिळाले.

 

 

 

 

या पत्रात अनंत अंबानी यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्या संस्थेला १५ कोटी रुपयांची देणगी दिल्याची माहिती आहे.

 

 

निनावी पत्रात असलेल्या माहितीनुसार, भगतसिंग कोश्यारीसारख्या माणसाने आपल्या पदाचा उपयोग करून उत्तराखंड मधील एका शाळेच्या नावाने भरपूर माया गोळा केली आहे.

 

 

 

१०० सुद्धा मुले नाहीत, अशा शाळेकरिता कोट्‌यावधीच्या देणग्या गोळा केल्या आहेत. त्या पैशातून आपला पुतण्या दिपेंदरसिंग कोश्यारी याच्यासाठी शाळेच्या आसपास भरपूर जमीन खरेदी करून तिथे रिसोर्ट सुरू केली आहे.

 

 

 

अनंत अंबानी यांच्याकडून या शाळेसाठी १५ कोटी रुपये घेतले आहेत. शेर सिंग कार्की सरस्वती विहार, डिगरा मुवानी, चामू, कनालीछीना, पिथौरागढ उत्तराखंड देवस्थळी यांच्या नावाने भरपूर संपत्ती गोळा केली आहे.

 

 

 

 

२०१९ पूर्वी संस्थांना किती देणग्या मिळाल्या आणि २००९ ते २०२३ या कालावधीत किती देणग्या मिळाल्या या तुलना सहज करता येऊ शकतील.

 

 

 

Devbhumi Shiksha Prasar Samiti, Nainital Bank Haldwani Branch, Account No-0561000000000310 असा बँकेचा तपशील आहे. याशिवाय SBI मधील एका खात्यातही अनेक व्यवहार केले गेले आहेत, असा दावा या निनावी पत्रात करण्यात आला आहे.

 

 

 

 

अनिल गलगली यांना मिळालेल्या निनावी पत्रानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या पत्रात केलेल्या दाव्यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशीतूनच अंतिम सत्य बाहेर येईल, असे अनिल गलगली म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *