जितेंद्र आव्हाडांनी ठेवली होती थेट EVM मशिन्सच्या हालचालीवर नजर ,झाला मोठा फायदा

Jitendra Awhad had kept a close eye on the movement of EVM machines, which gave him a big advantage.

 

 

 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या सुनामीपुढे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अनेक बडे नेते पराभूत झाले.

 

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आपले अढळ स्थान कायम ठेवणारे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनाही यंदा पराभवाचे तोंड बघावे लागले.

 

राज्यात मविआची अशी वाताहात होत असताना शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी मात्र कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला.

 

यंदाच्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना पाडण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. या मतदारसंघात अजितदादा गटाच्या नजीब मुल्ला यांना रिंगणात उतरवण्यात आले होते.

 

मात्र, कळवा-मुंब्रा मतदारंसघातील मुस्लीम मतदारांना जितेंद्र आव्हाड यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना विजयी केले. या विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी

 

ईव्हीएम यंत्राच्या माध्यमातून कोणताही दगाफटका टाळण्यासाठी आपण नेमकी काय रणनीती आखली होती, याचा तपशील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

1 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्ह्यात EVM मशिन्सची FLC प्रक्रिया सुरू होणार असल्याची पहिली नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाकडून आली.

 

माझी एक टीम,ज्या मध्ये माझा कार्यकर्ता मोहसीन शेख आणि जिंदा सांडभोर हे त्यांच्या 25 सहकाऱ्यांच्या सोबत पहिल्या दिवसापासून या गोष्टीसाठी सज्ज होते.शिवाय त्यांच्या सोबतीला वकिलांची एक टीम देखील कामाला लागली होती.

 

जशी ही नोटीस मिळाली,माझ्या या टीमने यात पूर्ण गांभीर्याने लक्ष घालत अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर अगदी करडी नजर ठेवली.

 

EVM मशीन संदर्भात, FLC (First Level Checking) Randomisation I, Randomisation II, COMMISSIONING या प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून पार पाडल्या जातात. या प्रत्येक प्रक्रियेवर माझ्या टीमने लक्ष ठेवले. निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असल्यास तो त्यांच्या लक्षात आणून दिला.

 

चुका होत असल्यास त्यात माझी मदत घेऊन त्या दूर केल्या, प्रसंगी संबंधित अधिकारी लोकांच्या सोबत वाद घातले,गोड बोलून काम करून घेतली..यामागे एक रणनीती होती.ती म्हणजे या लोकांना EVM संदर्भात सुरू असणाऱ्या प्रत्येक बाबींवर लक्ष आहे,याची जाणीव त्यांना करून देण्याची.

 

अगदी EVM च्या transport देखील आमचं लक्ष होत.दरवेळी EVM एखाद्या ठिकाणावरून दुसरीकडे हलविण्यात येणार असतील तर त्या सगळ्या गाड्यांच्या मागे या टीम मधील लोक आपल्या गाड्या घेऊन निघायचे.

 

हे करताना ECI योग्य ते प्रोटोकॉल पाळत आहे की नाही,यावर देखील त्यांचं लक्ष असायचं.आणि काही गडबड असल्यास माझ्या लक्षात आणून द्यायचे.(एक गाडी without पोलीस प्रोटेक्शन, EVM घेऊन बाहेर निघाली होती,त्या संदर्भातील ट्विट तुमच्या लक्षात असेल.)

 

ECI च्या सगळ्या प्रक्रिया आम्ही पार पाडल्या असल्याने, आमच्याकडे कोणत्या बूथ वर कोणती मशीन जाणार आहे,याचे तपशील होते.

 

ते आम्ही आमच्या पोलिंग एजंट ला दिले. परिणामी आमच्या बुथवर इतर कोणत्या मशिन्स आणण्याची हिम्मत इथ कोणी करू शकल नाही.

 

Counting ला जाताना देखील माझ्या या काउंटीग एजंट ना वरील सगळी माहिती आम्ही दिली होती.त्यांची प्रशिक्षण यावर झाली होती.

 

थोडक्यात सांगायचं तर EVM संदर्भातील छोट्यातील छोट्या गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवलं.परिणामी कोणतीही धांदली माझ्या मतदार संघात होऊ शकली नाही.आणि मी मोठ्या मताधिक्याने माझ्या मतदार संघातून निवडून आलो…!

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *