राहुल गांधी निघाले भाजीपाला खरेदीला बाजारात ;पाहा;VIDEO

Rahul Gandhi goes to the market to buy vegetables; watch; VIDEO

 

 

 

नेहमीच वेग- वेगळे व्हिडीओ शेअर करणाऱ्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी भाज्यांचे भाव जाणून घेण्यासाठी थेट भाजी मंडई गाठली.

 

राहुल गांधींनी तेथील दुकानदारांना लसून, टोमॅटो आणि इतर भाज्यांचे दर विचारले. दुकानदाराने त्यांना सांगितले की लसूण ४०० रुपये किलो आहे. या भाजीमंडईला दिलेल्या भेटीचा एक व्हिडीओ राहुल गांधी यांनी शेअर केलेला आहे.

 

त्याला पोस्ट करताना राहुल गांधी यांनी लिहीलंय की कधी ४० रुपयांना मिळणारा लसूण आता ४०० रुपयांचा झाला आहे. वाढत्या महागाईने सामान्यांचे बजेट कोलमडले आहे आणि सरकार कुंभकर्णासारखे झोपलेले आहे.

 

राहुल गांधी यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ दिल्ली येथील गिरीनगर समोरील हनुमान मंदिर भाजी मंडईचा आहेत. या व्हिडिओ महिला बोलताना दिसत आहेत की त्यांना राहुल गांधी यांना चहासाठी बोलावले आहे.

 

म्हणजे त्यांना घरी येऊन पाहावे किती महागाई वाढलेली आहे.त्यामुळे गृहिणींचे बजेट गडबडलेले आहे.राहुल गांधींना महिला तक्रार करताना दिसत आहेत की पगार तर वाढलेला नाही.

 

परंतू वस्तूंचे दर वाढलेले असून ते कमी होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत आणखी दरवढ होण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणत आहेत.

 

व्हिडीओत महिलांना राहुल विचारत आहेत की आज काय खरेदी करत आहात? या प्रश्नावर एक महिला सांगते की ती थोडे टॉमेटो, आणि थोडा कांदा विकत घेऊ इच्छीत आहे म्हणजे वेळ निभावून नेला जाईल.

 

एक महिला भाजीवाल्याला विचारताना दिसते की यंदा भाजी एवढी महाग का आहे.? काहीच स्वस्त होताना दिसत नाही. कोणतीही भाजी ३०-३५ रुपयांना मिळत नाही. सर्वांचे दर ४०-४५ रुपयांपेक्षा जादा आहे.

 

राहुल गांधी यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात भाजीवाला देखील बोलताना दिसत आहे की यंदा महागाई जास्त आहे.यापूर्वी एवढी महागाई कधीच नव्हती.

 

राहुल गांधी भाजीवाल्याला विचारतात लसूण कितीला दिला ? यावर भाजीवाला लसणाची दर ४०० रुपये किलोवर आला आहे. एक महिला म्हणतेय की सोनं स्वस्त होईल पण लसूण नाही !

 

एक महिला या व्हिडीओत म्हणते की शलजमची भाजी ३०-४० रुपये किलो मिळायची तिचा भाव आता ६० रुपये किलो आहे.मटर १२० रुपये किलो मिळत आहे.

 

राहुल गांधी महिलांना विचारताना दिसत आहेत की महागाई दरवर्षी वाढत आहे. तुमच्यावर देखील त्याचा भार वाढला असेल ना ? राहुल यावेळी म्हणाले की जीएसटीने महागाई वाढली आहे. यास महिलांना दुजोरा दिल्याचे दिसत आहे.

 

दिल्लीत पुढच्या वर्षी फेब्रुवारीत विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्याआधीच राहुल गांधी एक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यांनी डॉ.आंबेडकर यांच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरलेले आहे.

 

राहुल गांधी सोमवारी परभणी येथे आले होते. तेथे संविधानाची प्रतिकृती नष्ट केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारानंतर अटक केलेल्या एका तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे.

 

या पीडीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची राहुल गांधी यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. सोमनाथ सुर्यवंशी दलित असल्यानेच पोलिसांनी त्यांना मारल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *