परभणीत राहुल गांधी म्हणाले “सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांनी हत्या केली
Rahul Gandhi said in Parbhani, “Somnath Suryavanshi was killed by the police”
परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरुने विटंबना केली होती.
या घटनेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांकडून आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या, त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं.
या आंदोलकांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण देखील होता.त्यांचा कोठडीतच मृत्यू झाला. सोमनाथ यांचा कोठडीत मृत्यू झाल्यानं वातावरण चांगलंच तापलं,
याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. दरम्यान आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली.
राहुल गांधी वाहानांच्या प्रचंड ताफ्यासह आज परभणीमध्ये दाखल झाले, त्यांनी निळा शर्ट परिधान केला होता. त्यांनी आज परभणीमध्ये जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली.
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाचं सांत्वन राहुल गांधी यांनी केलं. यावेळी सूर्यवंशी कुटुंब चांगलंच भावुक झालं. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी
अशी मागणी त्यांनी यावेळी केली.दरम्यान या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुला गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली, त्यांची हत्या झाली. मी सूर्यवंशी कुटुंबाला भेटलो. त्यांनी मला पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवला,
व्हिडीओ दाखवले. 99 टक्के नाही तर 100 टक्के पोलिसांनीच सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली. या तरुणाला केवळ यासाठी मारलं की तो एक दलित तरुण आहे, आणि तो संविधानाचं रक्षण करत होता. असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आरएसएसची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची विचारधारा आहे. ज्या लोकांनी हे केलं आहे, त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे.
मी यावर समाधानी नाही, या लोकांना मारण्यात आलं, हत्या केली. हे राजकारण नाही, तर न्यायाची गोष्ट आहे. लवकरात लवकर कारवाई करावी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी राहुल गांधी यांनी २० ते २५ मिनिटे चर्चा केली. त्या भेटीनंतर राहुल गांधी म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन मी अहवाल पाहिला आहे.
त्यांचे व्हिडिओ पहिले आहे. फोटोग्रॉफ पाहिले आहे. ते पहिल्यावर ९९ टक्के नाही तर शंभर टक्के सांगतो त्यांचा मृत्यू पोलीस कठोडीत झाला आहे. त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांच्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे वक्तव्य केले ते खोटो बोलले आहे.
सोमनाथ सूर्यवंशी दलित आहे. ते संविधाचे संरक्षण करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा संविधान संपवण्याची आहे. त्यामुळे त्यांना मारण्यात आले. यामुळे या घटनेला मी त्यांचा खून करण्यात आला आहे, असे म्हणाणार आहे.
परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला होता.
मात्र, पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी
आज बीड आणि परभणीचा दौरा केला. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. तसंच यावेळी बाळासाहेब थोरातही त्यांच्या बरोबर होते. बाळासाहेब थोरात यांनी सूर्यवंशी प्रकरणावर भाष्य केलं आहे.
सरकारची मानसिकता पाहिल्यानंतर काय अपेक्षा करणार? सर्वोच्च सभागृहात ज्या प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला जातो आहे त्याचा अर्थ पुरोगामी विचारांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी ही दुर्दैवी आहे.
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची घटना ही सरकारची मानसिकता दाखवणारी आहे. १० लाखांनी बलिदानाचा विषय संपतो का? सरकारची मानसिकता जाती धर्माचं विष पसरवणारी आहे.
१० लाखांची मदत देऊन हा विषय संपत नाही. असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तसंच विरोधी पक्षनेते जर येत असतील तर त्याला नौटंकी म्हणणं हे चुकीचं आहे. समाजाकडे ते याच दृष्टीने पाहतात हेच यातून दिसतं असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राहुल गांधींनी हे म्हटलंय की हत्या आहे कारण हे प्रकरण तसंच आहे. काही व्हिडीओ समोर आले आहेत. राहुल गांधींनी हा मुद्दा समोर आणला आहे.
अधिवेशनात आम्ही हा मुद्दा समोर आणला. पूर्ण चौकशी झाली की नाही हे वाटत असतानाच सरकारने निर्णय दिला आहे. सूर्यवंशी यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आमचं जन आंदोलन सुरु आहे असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी होता, तो लॉ अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त व्हिडीओ रेकॉर्ड करत होता.
पण पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रमाणे खुणा दिसत होत्या. तो पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा बळी ठरला. तो न्यायालयीन कोठडीत असला तरी त्याचा मृत्यू पोलीस कोठडीतील अमानुष मारहाणीमुळे झाला, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता
सुषमा अंधारे यांनी मृत सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा असलेला फोटो सगळ्यांना दाखवला. तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत संशय व्यक्त केला.
विजय वाकोडे हा जुना पँथरचा माणूस आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारीरिक व्याधीमुळे विजय वाकोडे जागेवरुन हलू शकत नाहीत.
हा माणूस रस्त्यावर येऊन तोडफोड करु शकत नाही. तर रवी सोनकांबळे हा माजी नगरसेवक होता. हा अत्यंत समंजस व्यक्ती आहे.
रवी सोनकांबळे याने अनेक वर्षे परभणीतील शांतता कमिटीत काम केले आहे. पोलिसांनी एकाच कुटुंबातील सगळ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत असंही अंधारेंनी म्हटलं होतं.