महायुतीच्या जागावाटपाचे असे ठरले ठरले सूत्र कोणाला किती जागा?
The formula for the seat distribution of the Mahayuti was decided, how many seats for whom?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशाच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील जागावाटप अंतिम झाल्याचे सूत्रांकडून कळते. महायुतीने जागा वाटप करताना तिन्ही पक्षांनी ९ आकडा हा अंतिम केल्याचे समजते.
यानुसार विधानसभा निवडणुकीत भाजप १२६, शिंदे गट ९० आणि अजित पवार गट ७२ जागा लढवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी राज्य विधानसभेच्या २८८ जागांपैकी कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याबाबत दिल्लीतील
भाजप नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यामध्ये बोलणी करून अंतिम केले असून याबाबतची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसात होणार आहे.
राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांमधील जागावाटप करताना मोठा भाऊ हा भाजपच राहणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष असणाऱ्या
शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्यात आलेल्या जागेवरच समाधान मानावे लागणार आहे. शिवसेना शिंदे गटाने शंभरच्या वर जागांची मागणी केली होती,
मात्र शिंदे गटाला ९० जागा पदरात पडल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील ८० ते ८५ जागांची मागणी केली होती. मात्र अजित पवारांना देखील ७२ जागांवरच समाधान मानावे लागले आहे.
मोठा भाऊ असलेल्या भाजपाने मात्र मागच्या निवडणुकीत १०६ जागा वर विजय संपादन केला होता. आता विधानसभा निवडणुकीत १२६ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन भाजपने सर्वाधिक जागा पदरात पाडून घेतल्या आहेत.
त्यामुळे शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही गटांना भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या जागांवरच समाधान मानावे लागणार आहे.
राज्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या आचारसंहिता सोमवार १४ ऑक्टोबरपासून लागण्याचे संकेत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत अद्याप कोणी किती जागा लढायच्या
यावर बोलणी सुरू आहे. अशात महायुतीमधील भाजपा, शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी यांचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाल्याचे समजेत.
या जागा वाटपात खरा फटका शिंदे सेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी या दोन पक्षांमधील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
या वाटपामुळे त्यांचा मात्र हिरमोड होणार आहे. तशीच अवस्था मागील म्हणजेच २०१९च्या विधानसभा निवडणुकीत थोड्याफार मताने पराभूत झालेल्या भाजपाच्या
त्या उमेदवारांना यंदाच्या निवडणुकीत देखील शिंदे गट व अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामुळे तिकीट मिळणार नसल्याने भाजपात देखील काही प्रमाणात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीला उभे राहणारे उमेदवार असो की महानगरपालिका, नगरपालिका ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती, ते थेट ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी उभे राहणारे
उमेदवार असो प्रत्येक उमेदवार आपल्या मोबाईल क्रमांकापासून ते वाहनाच्या क्रमांकापर्यंत ते थेट उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत सर्वजण शुभ अंकापासून सुरुवात करतात.
त्याचप्रमाणे राज्यातील महायुतीमधील भाजपा शिंदे गट व अजित पवारांची राष्ट्रवादी या सर्वच सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच जागा वाटप करताना शुभ आकडा प्रमाण धरून नऊ आकड्याला प्राधान्य दिल्याचे
प्राप्त माहितीवरून दिसत आहे. एकंदरीत ९ आकडा हा महाविकास आघाडीला सत्तेच्या सारीपाटापर्यंत नेईल की नाही याचे गणित विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होईल.