वाढीव मतदान शंका, मंगळवारी निवडणूक अयोग करणार खुलासा

Election Commission to clarify on increased voting doubts on Tuesday

 

 

 

राज्यातील विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदान व इतर वादग्रस्त मुद्द्यांसंदर्भात ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. काँग्रेसची ही मागणी आयोगाने मान्य केली असून तसे पत्र शनिवारी काँग्रेसला पाठवण्यात आले.

 

काही मतदारसंघांमध्ये मतदारांची नावे गायब झाली असून काहींमध्ये मतदारांमध्ये वाढ झाली आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये अनियमितता असल्याचा दावा काँग्रेसने केला होता.

 

मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ ते रात्री साडेअकरा या दरम्यान मतांच्या टक्केवारीत अनपेक्षित वाढ झाली असून हे वाढीव मतदान शंकास्पद असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता.

 

या दोन मुद्द्यांवर आयोगाने सुनावणी घ्यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चन्निथाला व महासचिव मुकुल वासनिक यांनी पत्राद्वारे केली होती. यासंदर्भात तीनही नेत्यांनी आयोगाची शुक्रवारी भेटही घेतली होती.

 

मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्व राजकीय पक्षांना सहभागी करून घेतले जाते. मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातात व त्याची प्रत पक्षांना दिली जाते व त्यांना पडताळणी करण्यासही सांगितले जाते.

 

ही प्रक्रिया पारदर्शक असते तरीही काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची आयोगाने दखल घेतली आहे. त्यासंदर्भातील मुद्द्यांची सुनावणीवेळी दखल घेतली जाईल, असे आयोगाने काँग्रेसला पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

मतदान पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी ‘अर्ज १७-क भाग-१’च्या माध्यमातून उमेदवारांना दिली जाते. अर्ज १७ मधील आकडेवारीमध्ये कोणताही बदल केला जात नाही.

 

मतदानाची अंतिम आकडेवारी रात्री ११.४५ वाजता व्होटर अपवर प्रसिद्ध केली जाते. संध्याकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणारी मतांची टक्केवारी

 

व रात्री पावणेबारा वाजता दिल्या जाणारा मतांचा अंतिम टक्का यांच्यातील तफावतीसंदर्भात आयोगाने अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे, असे आयोगाने म्हटले आहे.

 

दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. तर काँग्रेसने 288 जागांपैकी 101 जागांवर निवडणूक लढवली होती.

 

त्यापैकी केवळ 16 जागाच काँग्रेसने जिंकल्या आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर आरोप केला जात आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकूण मतांमध्ये ७६ लाख मतांची वाढ कशी झाली? असा सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. आता पुन्हा नाना पटोले यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.

 

काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर जे मतदान झालं आहे,

 

त्याचे फोटो दाखवा. हे मतदान कुठल्या सेंटरवर झालं? साडेसात टक्क्यांनी मतदान कसं वाढलं? या सर्वाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.

 

तसेच जनतेची मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम निवडणूक आयोग करत असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला होता.

 

आता नाना पटोले यांनी पुन्हा एकदा तोफ डागली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे यश आलेलं आहे तो लाडक्या बहिणींचा प्रभाव नव्हता. हा सगळा प्रभाव निवडणूक आयोग

 

आणि भाजप या दोघांनीही मिळून केलेल्या पापाचे फळ आहे. महाराष्ट्रात जनतेचं सरकार नं येता निवडणूक आयोगाच्या कृपेनं आलेलं भाजपचं सरकार येतंय. त्यामुळं महाराष्ट्रात सगळीकडं आक्रोश आहे.

 

लोकं सरकार आमचं आहे, असं म्हणायलाच तयार नाही. भाजपवाल्यांचे चेहरे पाहिले तरी त्यांनाही असं वाटतंय की, आम्ही तर मतदान मारलंचं नाही, हे सरकार आलं कुठून?

 

भाजपवाल्यांच्या मनातही हीच परिस्थिती असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. आता नाना पटोले यांच्या टीकेवर भाजप काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *