आता समोसे आणि केक चा तपास करणार CID; प्रशासनात खळबळ

CID will now investigate samosas and cakes; Excitement in the administration

 

 

 

 

महाराष्ट्राच्या राजकारणात खोक्यांची चर्चा सुरु असताना, त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उडालेली असताना

 

आता हिमाचल प्रदेशच्या राजकारणात समोस्याचे बॉक्स चर्चेत आहेत. समोसा आणि केकच्या खोक्यांवरुन हिमाचल प्रदेशात सरकारमध्ये खळबळ उडाली आहे.

 

समोसा प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात आली. त्याचा अहवालदेखील समोर आला. मुख्यमंत्र्यांसाठी केक आणि समोसा मागवण्यात आलेला कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची बाब तपासात समोर आली.

 

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सिक्खू २१ ऑक्टोबर सीआयडी मुख्यालयात पोहोचले होते. त्यांच्यासाठी तीन खोक्यांमध्ये समोसे आणि केक मागवण्यात आला होता.

 

पण हे खाद्यपदार्थ मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्याऐवजी सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यात आले. यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाचं काम सीबीआयकडे सोपवण्यात आलं.

 

मुख्यमंत्र्यांसाठी मागवण्यात आलेले समोसे आणि केक कोणाच्या चुकीमुळे मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले याचा तपास सीआयडीनं केला.

 

हे कृत्य सरकार आणि सीआयडी विरोधी असल्याचा शेरा एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं तपास अहवालावर मारला आहे. २१ ऑक्टोबरला मुख्यमंत्री

 

एका कार्यालयासाठी सीआयडी मुख्यालयात गेले होते. मुख्यमंत्र्यांसाठी मागवण्यात आलेले समोसे आणि केक चुकून त्यांच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

कोणत्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे मुख्यमंत्र्यांसाठी मागवण्यात आलेले पदार्थ त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले गेले, याचा उलगडा चौकशीतून झालेला आहे.

 

एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं तपास अहवालावर मारलेला शेरा चर्चेचा विषय ठरला आहे. ‘अहवालात नावं असलेल्या सगळ्यांनीच सीआयडी आणि सरकार विरोधी पद्धतीनं काम केलं.

 

त्यामुळेच हे खाद्यपदार्थ व्हीव्हीआयपींना देता आली नाहीत. या सगळ्यांनी त्यांच्या अजेंड्यानुसार काम केलं,’ असा शेरा उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं अहवालावर मारला आहे.

 

तपास अहवालानुसार, आयजी रँकच्या अधिकाऱ्यानं एका पोलीस उपनिरीक्षकाला आपल्या कार्यालयात बोलावलं आणि त्याला शिमल्याच्या लक्कड बाजारात असलेल्या

 

रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमधून मुख्यमंत्र्यांसाठी काही खाद्यपदार्थ मागवण्याचे आदेश दिले. यानंतर एका एएसआय आणि एचएचसी चालकाला सामान आणण्यासाठी पाठवण्यात आलं

 

ते हॉटेलमधून समोसे आणि केकचे तीन खोके घेऊन आले आणि हे सामान पोलीस निरीक्षक दर्जाच्या एका महिला अधिकाऱ्याला देण्यात आलं.

 

यानंतर पोलीस निरीक्षक पूजा यांनी ते सामान एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या खोलीत ठेवण्यास सांगितलं. त्यानंतर ते तिथून अन्यत्र ठिकाणी हलवण्यात आले.

 

त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पर्यटन विभागाच्या कर्मचाऱ्यांना खाद्यपदार्थ देण्याबद्दल विचारणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना खाद्यपदार्थ द्यायचे आहेत, असं त्यांना विचारण्यात आलं असता, हे पदार्थ मुख्यमंत्र्यांच्या मेन्यूमध्ये नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या कर्मचाऱ्यांची चहापाण्याची व्यवस्था एका एमटीओ आणि एचएएसआयकडे सोपवण्यात आली होती.

 

या तीन खोक्यांमधील खाद्यपदार्थ मुख्यमंत्र्यांना द्यायचे आहेत, याची कल्पना आपल्याला नव्हती, असं महिला अधिकाऱ्यानं सांगितलं. तिनं तिन्ही खोके न उघडताच एमटी सेक्शनला दिले.

 

आयजींच्या एचएएसआयच्या जबाबानुसार, जे तीन खोके उघडे होते, ते एक एसआय आणि एचएचसी घेऊन आले होते. हे खाद्यपदार्थ आयजी साहेबच्या कार्यालयात बसलेल्या डीएसपी

 

आणि अन्य कर्मचाऱ्यांना द्यायचे असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या सूचनेवरुन खोक्यांमधील खाद्यपदार्थ खोलीत बसलेल्या १० ते १२ जणांना चहासोबत देण्यात आले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *