कंत्राटी कर्मचारी पगार महिन्याला 13 हजार ,मात्र कमाई 21 कोटी 59 लाख 38 हजार
Contractual employee salary is 13 thousand per month, but income is 21 crore 59 lakh 38 thousand
2 कंत्राटी कर्मचाऱ्याननी क्रीडा विभागाच्या बँक खात्यातून तब्बल 21 कोटी रुपये लाटल्याचा घोटाळा छत्रपती संभाजीनगरमध्ये उघड झाला आहे.
इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातून वर्षभरात तब्बल 21 कोटी 59 लाख 38 हजार 287 रुपये दोन कंत्राटी लिपिकांनी काढून घेतल्याने खळबळ उडाली आहे.
हर्षकुमार क्षीरसागर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हर्षकुमार क्षीरसागर हा संभाजी नगरच्या विभागीय क्रीडा संकुलातील कंत्राटी लिपिक पदावर काम करतो.
याचा पगार आहे फक्त 13 हजार. पण त्यानं आतापर्यंत कमावलेत तब्बल 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपये. या पठ्ठ्यानं वर्षभरातच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून कोट्यावधी रुपये आपल्या 2 बँक खात्यांवर वळते केले.
नंतर ते तब्बल 15 पेक्षा जास्त खात्यावर वळवून खर्च केले. यासाठी त्यांन यशोदा शेट्टी या कर्मचाऱ्याचीही मदत घेतली. वर्षभरानंतर हर्षकुमारचं हे गौडबंगाल उजेडात आलं.
क्रीडा अधीक्षकांच्या लक्षात तब्बल वर्षभरानंतर हा प्रकार लक्षात आलं आणि आता या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
धक्कादायक म्हणजे वर्षभरापासून हा प्रकार सुरू असताना कुणाच्या लक्षात का आला नाही त्यामुळं यात अजून किती जण सहभागी आहे याबाबत ही संशयाला वाव आहे.
हा 21 कोटींचा निधी राज्य सरकारने क्रीडा विभागाला सिनथेटिक ट्रॅक आणि अस्ट्रोटॅर्फ साठी दिला होता , हे काम तातडीने होणे नाही ही गोष्ट आरोपींच्या लक्षात आली त्यामुळं हर्षकुमार क्षीरसागर आणि यशोदा शेट्टी यांनी उपसंचालकांची खोटी स्वाक्षरी करून नेट बँकिंग सुविधा खात्यावर सुरू केली.
त्यानंतर कार्यालयीन जुन्या पत्रांमध्ये छेडछाड करून बँकेत बनावट पत्र सादर केले. आरोपी हर्षकुमार क्षीरसागरने स्वतःच्या मोबाइल क्रमांकावर नेटबँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी बनावट ई-मेल आयडी तयार केला.
आणि, बनावट ई-मेल आयडीच्या माध्यमातून विभागीय क्रीडा संकुल समितीच्या नावे असलेल्या खाते आणि नेटबँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी पत्र पाठवले.
नेटबँकिंग सुविधा सुरू झाल्यावर क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातून इतर खात्यावर पैसे वळवले, क्षीरसागर याने या पैशातून आलिशान कार खरेदी केली,
टुमदार घर ही बांधले इतकंच नाही तर तब्बल 5 पेक्षा जास्त देशामध्ये फिरूनही आला. गुन्हा दाखल होईल याची शंका येताच फरार ही झाला.
या प्रकरणात आता 3 जणांवर गुन्हा दाखल झालाय,. पोलिसांनी महिला आरोपी यशोदा शेट्टी आज तिचा पती बी.के. जीवन याला अटक केली आहे. तर क्षीरसागर याचा शोध सुरुय..
मात्र इतका मोठा निधी बँक खात्यातून गायब होतो आणि त्याची पुसटशी कल्पना ही कुणाला येत नाही ही बाब मात्र न पटणारी आहे त्यामुळं याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
मात्र, सरकारी निधीवर राजरोस डल्ला मारला जातो आणि वर्षभर कुणाला पत्ता लागत नाही, यातूनच प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा अधोरिखित होतोय.