अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शपथ घेतलेले 10 मंत्री
10 ministers sworn in from Ajit Pawar's NCP
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे
आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१५ डिसेंबर) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये पार पडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच महायुतीत मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचंही बोललं जात होतं. मात्र,आज अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.
नागपूरमधील राजभवनावर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. दरम्यान, महायुतीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला आणि शिवसेना (शिंदे) पक्षाला किती मंत्रिपदे मिळतात?
आणि कोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळते? तसेच या मंत्रिमंडळात कोणत्या नवनिर्वाचित चेहऱ्यांना संधी देण्यात येते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.
अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. यामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या १० नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
हसन मुश्रीफ,
धनंजय मुंडे,
हसन मुश्रीफ,
दत्तात्रय भरणे,
आदिती तटकरे,
माणिकराव कोकाटे,
नरहरी झिरवाळ,
मकरंद जाधव,
बाबासाहेब पाटील
यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली, तर
इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)
या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.