वितरीकेला पाणी न सोडल्याने बाबळगाव सर्कलमधील पिके वाळू लागली

Crops in Babalgaon circle wilted due to lack of water supply

 

 

 

 

पाथरी तालुक्यातील बाबळगाव सर्कल मधील लोणी बुद्रुक बाबळगाव कानसुर लिंबा या ग्रामीण भागातील जायकवाडी धरणाचे गेल्या वीस दिवसापासून

 

पाणी न सोडल्याने सर्व पिकांचे झाले असून याकडे कोणत्याही प्रतिनिधीने लक्ष न दिल्याने जायकवाडी धरणाच्या अधिकाऱ्याने लिंबा 59 बी मध्ये पाणी न सोडल्याने खूपच पिकाचे नुकसान झाले असून

 

येथील शेतकरी खूप नाराज झाले आहेत तसेच या सर्कलमधील शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे की जर या दोन दिवसात पाणी जर नाही सुटले तर आम्ही लोकशाही मार्गाने पाटबंधारे अधिकारी कार्यालय पाथरी येथे आंदोलन करू

 

असा इशारा बाबळगाव सर्कल मधील शेतकऱ्यांनी दिला आहे तसेच मा. उपविभागीय अभियंता जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्रमांक 6 पाथरी जिल्हा परभणी यांना निवेदन देण्यात आले की जायकवाडी पाण्याचे दुसरे आवर्तन चालू झाले असताना देखील

 

बी 59 लिंबा वित्तरिकेला अद्याप पर्यंत पाणी आवर्तन देखील विततरीकेला लोणी कांसूर लिंबा या गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सध्या दुसरे आवर्तन सुरू असताना

 

मागील पंधरा दिवसा पासून वरील गावातील शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पाणी मिळत नाही त्यामुळे सदरील शेतकऱ्यांचे जायकवाडी पाण्याच्या भरवशावर पेरणी करण्यात आलेली ज्वारी गहू ऊस बाजरी हरभरा आधी पिके पाण्यावर अभावी करपत आहेत

आपणास वारंवार विनंती करून देखील आपण याची दखल न घेतल्यामुळे शेतकरी हवालदित झाला असून आपण दिनांक 1 फेब्रुवारी 2025 च्या आत बी 59 लिंबा वितरीकेला पाणी न सोडल्यास दिनांक 1/2 / 2025 वार शनिवार या दिवशी

 

शेतकऱ्यांच्या हितासाठी मी रवींद्र धर्मे आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे तरी कृपया आपण याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा माझ्या जीवितास काही धोका झाल्यास

 

त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर व आपल्या कार्यालयावर राहील याची नोंद घ्यावी. असे निवेदन रवींद्र रामकिसन धर्मे शिवसेना उपजिला प्रमुख परभणी यांनी दिले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *