जरांगेंचा फडणवीस सरकारला थेट इशारा ,म्हणाले दगाफटका कराल तर …

Jarange's direct warning to Fadnavis government, saying if you cheat...

 

 

 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे गेल्या 5 दिवसांपासून उपोषण आंदोलन करत आहेत. दरम्यान जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. आमच्या मागण्या पूर्ण करणार आहात की नाही

 

या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगावं, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे. तर दगा फटका कराल तर 5 वर्ष तुम्हाला सत्तेत सुखानं राहू देणार नाही असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे. तसेच जरांगेंनी डॉक्टरांच्या तपासणीसाठी नकार दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, आमच्या मागण्या पूर्ण करणार की नाही… आम्ही अजून किती वाट बघायची…आमचा अंत बघणार आहात का? उपोषणावर मी ठाम आहे –

 

आरक्षण देणार की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. दगाफटका कराल तर खबरदार. पाच वर्ष तुम्हाला सत्तेत सुखानं राहू देणार नाही.

 

मनोज जरांगे म्हणाले, मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी मागे पुढे सरकू शकतो पण स्वार्थासाठी नाही. यातच जातीच कल्याण आहे. आमच्या एकाही बांधवांचा जीव जायला नको….

 

मला सरकारला विचारायचं आहे तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही. सगळे मेल्यावर सांगू नका दहा दिवसांनी सांगितल्यापेक्षा आजच संध्याकाळपर्यत सांगून टाका, म्हणजे उपोषण सोडून देऊन दुसरा मार्ग स्विकारता येईल.

 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणास्त्र उगारलंय. आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे.. सरकार जरांगेंकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पुण्यातील मराठा आंदोलकांनी केलाय.

 

या आंदोलनात 10 दिवस मराठा आंदोलनकर्ते उपोषण करणार असून त्याचबरोबर येत्या दोन दिवसात जर सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिलं नाही. तर राज्यभर मराठा समाजाचा आक्रमक आंदोलन पाहायला मिळेल असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

 

सरकार जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत पुण्यात देखील मराठा आंदोलकांकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आला आहे. या आंदोलनात 10 दिवस माराठा आंदोलनकर्ते आंदोलन उपोषण करणार असून

 

त्याचबरोबर येत्या दोन दिवसात जर सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिलं नाही. तर राज्यभर मराठा समाजाचा आक्रमक आंदोलन पाहायला मिळेल असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *