लोकसभेत पराभूत झालेले भाजपचे 4 बडे नेते पुन्हा निवडणुकीच्या मैदानात

4 BJP leaders who were defeated in the Lok Sabha are again in the election field

 

 

 

अवघ्या चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पराभव झालेल्या दोन बड्या नेत्यांना भाजपकडून पुन्हा एकदा विधानसभेसाठी संधी देण्यात आली आहे.

 

सुधीर मुनगंटीवार आणि मिहिर कोटेचा हे दोन उमेदवार पुन्हा एकदा भाजपकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मुनगंटीवारांना विधानसभेसाठी बल्लारपुर आणि मिहिर कोटेचा यांना मुलुंडमधून तिकीट देण्यात आलं आहे.

 

चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुधीर मुनगंटीवर आणि मिहिर कोटेचा यांना पराभव झाला होता. लोकसभेसाठी मुनगंटीवार हे चंद्रपूरमधून आणि मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतून रिंगणात होते.

 

चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार अशी लढत पाहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे ईशान्य मुंबईत मिहिर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत झाली होती.

 

लोकसभा निवडणुकांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा 2 लाख 60 हजार 406 मतांनी पराभव झाला होता. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघातून मुनगंटीवार आमदार राहिले आहेत,

 

त्याच बल्लारपूर मतदारसंघात प्रतिभा धानोरकरांना मताधिक्य मिळालं होतं. आता पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात उतरले आहेत.

 

लोकसभा निवडणुकांसाठी मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात होते. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील रिंगणात होते.

 

या निवडणुकीमध्ये मिहीर कोटेचा यांना एकूण 4 लाख 21 हजार 076 मत मिळाली, तर संजय दिना पाटील यांना एकूण 4 लाख 50 हजार 937 मत मिळाली.

 

लोकसभेतील पराभवानंतर मुनगंटीवार आणि मिहिर कोटेचा हे पुन्हा एकदा विधानसभेसाठी सज्जा झालेत. मुनगंटीवारांना याच मतदारसंघातून लोकसभेला निराशा मिळाली होती.

 

त्यामुळे मुनगंटीवारांसाठी ही लढत कठीण होणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मिहिर कोटेचा यांना मात्र त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला मताधिक्य मिळालं होतं.

 

त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत सोप्पी होणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. म्हणून लोकसभेला निराशा झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या दोन बड्या नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली असल्याचं पाहायला मिळतंय.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *