पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना दिला अजब सल्ला
Minister Gulabrao Patil gave strange advice to teachers to maintain the number of students

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना आम्ही ज्या पद्धतीने पक्ष फोडतो, त्या पद्धतीनं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल आहे.
माझ्या आयुष्यात मी बऱ्याच लोकांना त्रास दिला, मात्र मी तात्पुरत्या स्वरूपात बोललो आणि लगेच विसरलो, परंतु मी शिक्षकांना कधीच त्रास दिला नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही ज्या पद्धतीने पक्ष फोडतो, त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल आहे.
जळगाव ग्रामीण मधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण ४५ हजार एवढे विद्यार्थी आहेत, त्यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही, यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे विधान केलं आहे.
माझ्या आयुष्यात मी बऱ्याच लोकांना त्रास दिला, मात्र मी तात्पुरत्या स्वरूपाचा बोललो आणि लगेच विसरलो. मात्र शिक्षकाला मी कधीच त्रास दिला नाही. कारण शिक्षकांबद्दल आमच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे,
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या जर टिकवू शकलो असतो, तर 50 हजार डीएड झालेले मुलं नोकरीला लागले असते, असंही यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
जळगावात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा संकल्पनेंतर्गत तालुका स्तरावर शाळांना पुरस्कार वितरण सोहळा पार पडला, या सोहळ्यात गुलाबराव पाटील बोलत होते.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासराव देखील केल्याचं पाहायला मिळालं. मी विनोदानं बोललो , जसे आम्ही एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते आमच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करतो,
तसं शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत करावं, असं मला म्हणायचं होतं. यामध्ये दुसरा चुकीचा भाव नव्हता, पटसंख्या कशी वाढेल हे सांगण्यासाठी तो विनोदाचा भाग होता, असं यावेळी पाटील यांनी म्हटलं.