EVM विरोधातील लढ्यामध्ये आता राज ठाकरे ? लढा तीव्र होण्याचे संकेत

Raj Thackeray now in the fight against EVM? Signs that the fight will intensify

 

 

 

निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम फॅक्टर आहे, तो हेराफेरी करणारा आहे. त्यामुळे विधानसभेचा निकाल अनपेक्षित लागल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर, यांनी केले.

 

याबाबत पुढच्या आठवड्यात मी राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे जानकर म्हणाले. राज ठाकरे यांना माझ्याकडील पुरावे दाखवले तर ते आणखीन या लढईत ताकतीने उतरतील

 

असे जानकर म्हणाले. ईव्हीएमबाबतच्या लढ्यामुळं राज ठाकरेंना त्यांची पार्टी उभारण्यात मदत होईल असे जानकर म्हणाले. ईव्हीएमच्या लढ्यात मी राज ठाकरेंचे स्वागत करतो असेही जानकर म्हणाले.

ईव्हीएम मशीनने अनेक लोकांचा जीव घेतला आहे. लोकांचा आक्रोश मांडण्यासाठी या ईव्हीएममध्ये दुरुस्त करणे गरजेचे असल्याचे जानकर म्हणाले. मारकडवाडी संदर्भात मी राज ठाकरेंची भेट घेणार आहे.

 

सोमवारी किंवा मंगळवारी ही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितले. मारकडवाडी प्रकरणासंदर्भात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत ते मी इलेक्शन कमिशनलाही दिले आहेत. 15 दिवसांची वेळ दिली असल्याचे जानकर म्हणाले.

विधानसभेच्या निवडणुकीला चिठ्ठी पडण्याची वेळ वेगळी होती. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ज्या कक्षात सीसीटीव्ही लावले आहे. त्यातील पाच कक्षाचे सीसीटीव्ही देण्याची मी मागणी केली आहे असे जानकर म्हणाले.

 

मारकडवाडी प्रकरणात जिल्हा प्रशासनाने पोलीस का घातले? असा सवालही जानकर यांनी केला. मारकडवाडी प्रकरणातील जनतेचा आक्रोश आहे तो निवडणूक आयोगाला जाणून घेता आला नाही.

 

ईव्हीएमबाबत राजसाहेब असतील मनोज झा, राघव चड्डा, राहूल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अरविंद केजरीवाल साहेब यांना माहिती आहे. याबद्दल आम्ही काशीविश्वेश्वरापासून अयोध्या पर्यंत आम्ही सगळे साखळी आंदोलन उभे करु असे जानकर म्हणाले.

निवडणुकीतील पारदर्शकता आणल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही असेही ते म्हणाले. राज्य सरकारने आमचा काय छळ करायचा ते करु द्या आम्ही शांत राहणार नाही असेही जानकर म्हणाले.

 

मी किती मतांनी निवडून आलो आहे, हे दाखवण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. अन्यथा मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे असेही ते म्हणाले.

 

बॅलेट पेपरच्या मुद्द्यावरती मी आजही राजीनामे द्यायला तयार आहे. माझ्या मतदारसंघाची निवडणूक बॅलेट पेपर वर घ्या, हे मी सभापती आणि राज्य सरकारलाही सांगत आहे.

 

“लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही. लोकांनी मतदान केलं. पण केलेलं मतदान कुठे तरी गायब झालं. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या.

 

अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल. कोणी कोणत्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो”, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ताशेरे ओढले. ते आज मुंबईत बोलत होते.

 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक जण ईव्हीएमवर संशय व्यक्त करत आहेत. त्यातच आता काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने राज ठाकरेंना भावनिक साद घातली आहे.

“लोकशाही वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. लोकशाही मोडण्याचा प्रकार सुरू आहे. निवडणुक आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा स्वायत्त संस्थानच्या माध्यमातून लोकशाही मोडण्याचा कार्यक्रम चालला आहे.

 

त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी एका व्यासपीठावर आलं पाहिजे”, अशी साद काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरेंना घातली आहे. बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत जोरदार भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा उल्लेख केला.

“दर निवडणुकीत मला 50 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य राहिलं आहे. या वेळचा निकाल अनपेक्षित होता. जनतेलाही तो अनपेक्षित वाटला ही वस्तुस्थिती आहे. राज ठाकरे यांनी माझा उल्लेख केला.

 

माझ्याबाबत नाही तर राज्यात अनेकांच्या बाबतीत हे संशयाच वातावरण आहे. जे दिसतंय ते वेगळं आणि घडलं मात्र वेगळं. या बाबतीत आम्ही अपील देखील केलं होतं.

 

व्हीवीपॅट मोजण्याची मागणी केली होती. मात्र ते तयार नाहीत. फक्त ईव्हीएम मशीनचे आकडे दाखवणार असं सांगितलं. अनेक बंधने घातली जात आहेत. माहिती द्यायला तयार नाहीत. ही 100 टक्के संशयास्पद वस्तुस्थिती आहे”, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

“जे लोकसभेनंतर 48 लाख मतदार वाढले, त्यावर देखील काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. जो पाच वर्षात वाढू शकत नाही तो तीन चार महिन्यात कसा वाढू शकतो.

 

अनेक गोष्टी संशयास्पद आहेत. त्यावरच राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. मला राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल काही बोलायचं नाही.

 

जे योग्य वाटलं ते बोलले. ती भावना त्यांचीच नाही तर राज्याची आणि देशाची सुद्धा आहे”, असेही बाळासाहेब थोरातांनी सांगितले.

“जर असं होणार असेल तर काय उमेदवार उभे करणार आपण. काय मतदान करायचं अस लोकांना वाटत आहे. ती काळजी देखील राज यांनी व्यक्त केली आहे.

 

मात्र लोकशाही वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. सध्या लोकशाही मोडण्याचा प्रकार सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा स्वायत्त संस्थानच्या माध्यमातून लोकशाही मोडण्याचा कार्यक्रम चालला आहे.

 

ईव्हीएमबाबत आम्ही सोबत उभे राहिलो आहे. जनआंदोलन उभ करण्यासारखी परिस्थिती आहे. लोकशाही वाचवण्यासाठी एका व्यासपीठावर आलं पाहिजे”, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *