अजित पवारांसमोरच मुंडे, धस आणि सोनावणे यांच्यात बाचाबाची

High voltage drama between Ajit Pawar and Suresh Dhas

 

 

 

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गुरुवारी अपेक्षेप्रमाणे हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

 

भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविरुद्ध रान उठवले आहे.

 

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही सुरेश धस यांनी पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यासमोर त्याच आवेशात बीडमधील विकासकामांच्या नावाखाली पैसे उचलण्यात आल्याचा मुद्दा मांडला.

 

मात्र, विरोधकांना खमक्या भाषेत उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवार यांनी सुरेश धस यांचा ‘परफॉर्मन्स’ फार बहरुन दिला नाही. तुम्ही लई मागचे बोलू नका, तुम्हाला जे म्हणायचे आहे,

 

त्याची लेखी तक्रार करा, असे सांगत अजित पवार यांनी सुरेश धस यांचे बोलणे कापले आणि त्यांना फार वाव दिला नाही. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश नव्हता.

 

मात्र, ही बैठक संपल्यानंतर बाहेर पडलेल्या आमदार आणि लोकप्रतिनिधींमध्ये अजित पवार आणि सुरेश धस यांच्यात झालेल्या या खडाजंगीची खमंग चर्चा रंगली होती.

 

अधिकारांनी कुणाच्याही दबावात काम करण्याची गरज नाही. पोलिसांच्या कामातही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. बीड जिल्ह्यातील कामे दर्जेदार झाले पाहिजेत.

 

जर तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्ही थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क करा, असे अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले.

 

ही बैठक संपल्यानंतर सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घडलेल्या प्रकारविषयी सारवासारव करण्याचा प्रयत्न.

 

बैठकीत बाचाबाची झाली, पण तो प्रसारमाध्यमांनी चर्चा करण्याइतका मोठा विषय नसल्याचे सुरेश धस यांनी सांगितले. डीपीडीसीच्या आजच्या बैठकीत रिअॅप्रोपिएशनबाबत कुठलाही निर्णय झाला नाही.

 

आष्टीत जनावारांच्या बाबतीत झेरॉक्स आणि मशीन पोट तपासायचं मशीन त्यासाठी 50 लाख देण्याचा निर्णय झाला. बीडमधील विविध बोगस कामांसाठी तब्बल 73 कोटी रुपये उचलण्यात आले.

 

बोगस कामांसाठी पैसे उचलल्याचा मुद्दा मी उपस्थित केला. तेव्हा अजितदादांनी लेखी पत्र द्या, असे सांगितले. मी त्यानुसार लेखी पत्र तयार केले आहे.

 

बैठकीतील बाचाबाचीचा विषय किरकोळ आहे. मी हे बोगस पैसे उचलल्यासंदर्भातचे पुरावे आणि कागदपत्रे पेनड्राईव्हच्या माध्यमातून अजित पवार यांच्या पीएला दिली आहेत, असेही सुरेश धस यांनी सांगितले.

 

बीडमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली असून, यावेळी धनंजय मुंडे , सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनावणे आमने-सामने आले आहेत.

 

बीडची बदनामी आणि अधिकाऱ्यांवर दहशत असल्याच्या आरोपांवरुन तिन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी धनंजय मुंडे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सुरेश धस, बजरंग सोनावणे होते. बैठकीनंतर बजरंग सोनावणे यांनीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

 

डीपीडीसीच्या बैठकीत गैरव्यवहाराची सीडी, पेन ड्राईव्ह यांचा मुद्दा उपस्थित झाला का? असं विचारलं असता त्यांनी नाही असं म्हटलं, पुढे ते म्हणाले, ‘पण जर कोणीला एकाला बाजूला करुन बोललं तर आम्ही पाहत राहणार नाही.

 

दहशत कोणाची याचं उत्तर द्या सांगितलं. माजी पालकमंत्री म्हणाले इथे अधिकाऱ्यावर दहशत आहे. मग कोणाची दहशत आहे विचारल्यावर त्यावर बाचाबाची झाली. यानंतर बैठक संपली”. अजित पवार बैठक सोडून निघून गेल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला.

 

“वेगवेगळ्या पद्दतीने माडंलं असता आम्ही एका बाजूने आण ते दुसऱ्या बाजून बोलत होते. अधिकाऱ्यावर दहशत आहे, बीडची बदनामी करु नका सांगत होते. आम्ही बदनामी करतोय का?मर्डर, चोऱ्या करतोय का?

 

आम्ही राखेचा धंदा करतोय का? आम्ही खंडणी, मटका चालवतोय का? सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचं काम करत आहोत. संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागत आहोत, ही बदनामी आहे का? यावरुन बाचाबाची झाली,” अशी माहिती बजरंग सोनावणे यांनी दिली.

 

“बीडमधील प्रशासकीय मान्यता चुकीच्या पद्धतीने झाल्या आहेत. एक तर सीओनी कोणताही आराखडा मंजूर नसणाऱ्या कामाला मान्यता दिल्या आहेत.

 

दोन तीन महिन्यानंतर आम्हाला मागितलेली माहिती देण्यात आली. सोलापूर – जालना रेल्वे होण्यासाठी नवा ठराव डीपीडीसीचा मंजूर करण्यास सांगितला. त्याला सर्व सभागृहाने मान्यता दिली आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

 

“विमानतळाची मागणी सभागृहात केली तेव्हा सगळे मला हसले. या चार वर्षात बीडमध्ये विमानतळ करणारच. अजित पवारांनीही मी पैसे देतो, प्रस्ताव तयार करा असं सांगितलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *