कुंभहून परतताना महाराष्ट्रातील चौघांचा मृत्यू

Four people from Maharashtra die while returning from Kumbh

 

 

 

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी शनिवार घातवार ठरला. सिन्नर आणि वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चारजण ठार, तर सातजण गंभीर जखमी झाले.

 

पहाटे घडलेल्या एका अपघातात रत्नागिरी येथील चालकासह तीनजण ठार झाले. दुसऱ्या कार अपघातात सोनगाव (ता. राहुरी जि. नगर) येथील ४९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर, तिसरा अपघात किरकोळ स्वरूपाचा असून, त्यात कुणीही जखमी झाले नाही.

रत्नागिरी येथील सात जण हे कारने प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. शनिवारी पहाटे ते समृद्धी महामार्गाने घरी परतत असताना वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मलढोण शिवारात सकाळी सहाच्या सुमारास चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने

 

ती पुढील वाहनावर जाऊन आदळली. या अपघातात रत्नागिरी माळनाका येथील येथील डीएड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई ( य ६९), अथर्व किरण निकम (२४) आणि चालक भाग्यवान झगडे (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर निवृत्त सहाय्यक निबंधक किरण निकम (५८),

 

रमाकांत पांचाळ (६०), रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज (५०) आणि प्रांजल प्रकाश साळवी (२४) जखमी झाले आहेत. यातील निकम यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

 

दुसरा अपघात सोनांबे-सोनारीदरम्यान झाला. सोनगाव येथील अमोल भाऊसाहेब भाटे (३०) हे आई मंदा भाऊसाहेब भाटे (४९), पत्नी आणि

 

पाच वर्षांची मुलगी सोनल यांच्यासमवेत कारने वसई येथे सासुरवाडीला एका कार्यक्रमाला गेले होते. तेथून घरी परतत असताना चॅनल नंबर ५७०.७ येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पुढील ट्रकवर आदळली. या अपघातात मंदा भाटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत.

 

शनिवारी पहाटे ५.३०च्या सुमारास समृद्धी महामार्गावर मुंबईकडून पैठणकडे जाणाऱ्या टेम्पोचा पुढचा टायर फुटला. त्यामुळे टेम्पो लोखंडी बॅरियरवर जाऊन आदळला. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *