RBI ची 3 राष्ट्रीयकृत बँकेसह अभ्युदय बँकेवर मोठी कारवाई

RBI takes major action against Abhyudaya Bank along with 3 nationalized banks ​

 

 

 

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतला. बँकेने सिटी बँक, बँक ऑफ बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँक

 

 

 

या ३ मोठ्या बँकांना कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. तब्बल १०.३४ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबत आरबीआयने माहिती दिली आहे.

 

 

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, सिटी बँकेवर ठेवीदार शिक्षण आणि जागरुकता निधी योजनेशी संबंधित निकषांचे

 

 

पालन न केल्याप्रकरणी आणि वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगवरील आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 

 

 

 

आरबीआयने सिटी बँकसह बँक ऑफ बडोदालाही दंड आकारला आहे. डिपॉझिटरी ऑफ लार्ज कॉमन एक्स्पोजर निर्मितीसंबंधित काही निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ कोटीचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहितीही देण्यात आली.

 

 

 

 

बँक ऑफ बडोदानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेलाही दंड ठोठावला आहे. चैन्नईतील या बँकेला कर्ज आणि अॅडव्हान्सच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल १ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 

 

 

या तिन्ही प्रकरणांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहिती दिली. नियंमाचे पालन न झाल्याप्रकरणी हा दंड आकारण्यात आला आहे.

 

 

बँकानी ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा हेतू नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले.

 

 

अभ्युदय सहकारी बँकेचं नाव कारवाईमुळे चर्चेत आलं आहे. रिझर्व्ह बँकेने अभ्युदय सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं आहे.

 

 

त्यानंतर आरबीआयने प्रशासक नेमला आहे. आरबीआयने कारवाई केल्याने अभ्युदय बँकेच्या खातेदारांमध्ये चिंता पसरली आहे.

 

 

 

रिझर्व्ह बँकेने अभ्युदय सहकारी बँकेवर कारवाई करत संचालक मंडळ बरखास्त केलं आहे. आरबीआयने कारवाई केल्यानंतर प्रशासक नेमला आहे.

 

 

 

आरबीआयने प्रशासक म्हणून स्टेट बँकेचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक यांची नेमणूक केली आहे. तर प्रशासकाला मदतीसाठी एक तीन सदस्यांची सल्लागर समिती नेमली आहे.

 

 

 

अभ्युदय बँकेत प्रशासकीत कामकाजात अनियमितता आढळल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे. बँकेची आर्थिक स्थिती ठीक आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना कुठलाही त्रास होणार नसल्याचे बोललं जात आहे.

 

 

या बँकेवर एक वर्षासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. या काळात बँकेला कुठलीही नवी शाखा काढता येणार नाही. तसेच या काळात बँकेचे सर्व व्यवहार सुरळीत चालतील, त्यामुळे बँकेच्या खातेधारकांनी घाबरून जाऊ नये असं आरबीआयने म्हटलं आहे.

 

 

आरबीआयकडून अभ्युदय सहकारी बँकेचं संचालक मंडळ शुक्रवारी बरखास्त करण्यात आलं. आरबीआयने संचालक मंडळ एका वर्षासाठी बरखास्त केलं आहे.

 

 

आरबीआयच्या कारवाईनंतर बँकेचा व्यवहार सुरळीत चालणार आहे. आरबीआयने कारवाईनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे.

 

 

 

प्रशासकाहित सल्लागारांची समिती नेमण्यात आली आहे. सल्लागार समिती प्रशासकाला कामात मदत करणार आहे. या समितीत एसबीआयचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे, सीए महेंद्र छाजेड आणि कॉस्मोस सहकारी बँकेचे लिमिटेड माजी व्यवस्थापकीय संचालक महेंद्र गोखले यांचा सामावेश करण्यात आला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *