संजय राऊत यांचा खळबळजनक गौप्यस्फोट;शिंदेंना -अमित शहांनी दिलेले आश्वासन पाळले नाही

Sanjay Raut's sensational revelation; Amit Shah did not keep the promise made to Shinde

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये काही आलबेल नसल्याचं दिसत आहे. मंत्रिपदे वाटण्यापासून ते पालकमंत्री वाटपापर्यंत शिंदे नाराज असल्याचं अनेकदा समोर आलं होतं.

 

अशातच संजय राऊत यांनी शिदे गटातील आमदारासोबत झालेल्या बोलण्याबाबत अग्रलेखात सर्वकाही सविस्तरपणे सांगितलं आहे. अमित शहा यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही असं शिंदेना वाटत असल्याचं आमदाराने राऊतांशी बोलताना सांगितंल.

शिंदे गटाचे एक त्यातल्या त्यात बरे आमदार विमान प्रवासात भेटले. त्यांनी त्याही पुढची माहिती देऊन गोंधळ वाढवला. “शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत.

 

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे व फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती. आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत. कारण शिंदे यांच्या हातात काहीच राहिलेले नाही.”

 

“निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू व 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका. निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा, असे आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिले होते.

 

शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला, पण शहा यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही व आपली फसवणूक झाली असे शिंदे यांना वाटते”- आमदार

या आमदाराने पुढे माहिती दिली ती महत्त्वाची. “शिंदे व त्यांच्या लोकांचे फोन टाप केले जात आहेत असे शिंदे यांना खात्रीने वाटते व दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे, पण शिंदे यांची पुरती कोंडी आता झाली आहे.”

 

दरम्यान, संजय राऊतांना विमानामध्ये भेटलेला आमदार कोण? खरंच शिंदे आणि फडणवीसांमध्ये जुगलबंदी सुरू आहे का?असे अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत. यावर एकनाथ शिंदे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

महायुतीचा महाविजय झाला. त्यात भाजपाने सर्वाधिक जागा खेचून आणल्या. मुख्यमंत्री भाजपाचा झाला. पण याकाळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाराजी नाट्य अधिक गाजले.

 

आता विधानसभेचा निकाल येऊन बराच काळ लोटला असला तरी उद्धव ठाकरे सेनेने एकनाथ शिंदे यांना डिवचण्याची संधी काही सोडली नाही.

 

आजच्या सामनातील रोखठोकमधून चिमटे नि गुदगुल्या केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, एकनाथ शिंदे हे शुन्यात गेल्याचा खोचक टोला लगावला. ते दोन धक्क्यातून सावरले नसल्याचा टोला हाणला.

 

सामनातील रोखठोक मधील विषय सर्वांनाच माहिती आहे. महायुतीत एकसंघात नाही, एक वाक्यता नाही, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

 

एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद, कुरघोडी करण्याची ताकद भाजपाने संपवल्याचा टोला त्यांनी हाणला.

 

भाजपामुले एकनाथ शिंदे आणि त्यांचा गटाचा एक सरपटणारा प्राणी झाला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असे वचन दिल्यानंतरच ते शिवसेनेतून फुटल्याचे खासगीत ते सांगतात, असे राऊत म्हणाले.

 

एकनाथ शिंदे यांना भाजपाने विधानसभा निवडणूक 2024 नंतर सुद्धा मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळेच त्यांनी शिवसेना फोडली, असे ते खासगीत सांगतात.

 

मी खोटं बोलत नाही, तुम्हाला तसं वाटत असेल तर त्यांना जाऊन विचारा, असे राऊत म्हणाले. पण निवडणूक झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केले.

एकनाथ शिंदे यांची भाजपाने काही मंत्री पदावर बोळवण केली. पण शिंदे यांची देहबोली बरंच काही सांगून जाते. एकनाथ शिंदे हे शुन्यात आहेत. ते धक्क्यातून सावरलेले नाहीत.

 

इतके विरोधी वातावरण असताना आपल्या पक्षाला 50-55 जागा मिळाल्या कशा, हा पहिला धक्का तर भाजपाने मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला नही हा दुसरा धक्का त्यांना बसला आहे. एकनाथ शिंदे हे पूर्णपणे कोलमडलेले आहेत. त्यांची या सरकारमध्ये कोंडी झाली आहे, अशी टीका राऊतांनी केली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *