रेल्वेत टीसीकडूनच प्रवाश्याला तुंबळ मारहाण;हा VIDEO होतोय व्हायरल

A passenger was beaten up by the TC in the train; this VIDEO is going viral ​

 

 

 

 

 

भारतीय रेल्वेच्या जनरल डब्यात अनेकदा प्रचंड गर्दी असते. यामध्ये अधिकृतरित्या प्रवास करणाऱ्यांसह ट्रेनचे तिकीट न काढता शिरणाऱ्यांचा सुद्धा समावेश असतो.

 

 

 

गर्दीमुळे काहीवेळा तिकीट तपासले सुद्धा जात नाही आणि यामुळेच कित्येक जण रेल्वेच्या सुविधांचा गैरवापर करतात. विनातिकीट प्रवास हा निश्चितच एक गुन्हा आहे

 

 

 

पण एखाद्याकडून गुन्हा झाला तर त्याला शिक्षा सुद्धा कायदेशीररीत्याच व्हायला हवी. हाच मुद्दा अचानक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असणारा एक व्हिडीओ.

 

 

अनेकांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओ तिकीट तपासण्यासाठी रेल्वेच्या डब्यात चढलेला एका टीटीई प्रवाशाला चक्क कानाखाली मारताना दिसत आहे. नेमकी या व्हिडिओची खरी कहाणी काय हे आपण सविस्तर पाहूया..

 

 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या कॅप्शनमधून समोर आलेल्या माहितीनुसार, बरौनी लखनऊ एक्सस्प्रेसमध्ये सदर घटना घडली होती.

 

 

प्रवाशाकडे अधिकृत तिकीट नसल्याने एका टीटीईने चक्क सर्वांसमोर त्याला मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावरून नेटकऱ्यांनी प्रश्न करत सरकारी कर्मचाऱ्याला अशाप्रकारचे हक्क दिलेले आहेत का? असे विचारले आहे.

 

 

शिवाय टीटीईला जर तिकीट नाही हे लक्षात आले असेल तर त्याने प्रवाशाच्या तोंडावर कायद्याचे, नियमाचे पुस्तक फेकून मारायचे होते, मारहाण करण्याची काय गरज?

 

 

अशाप्रकारे सामान्य माणसांना सरकारी कर्मचारी अपमानास्पद वागणूक देऊ शकतात का? अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओखली पाहायला मिळत आहेत.

 

 

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर, भारतीय रेल्वेकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या टीसीला प्रवाशावर हात उचलल्याने निलंबित केले असून,

 

 

संबंधितांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे लखनऊच्या अधिकृत डीआरएम (डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर) कडून देण्यात आले आहे.

 

 

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या पायलटला एका प्रवाशाने मारहाण केल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. विमानांना झालेल्या दिरंगाईमुळे संतप्त प्रवाशाने घोषणा करत असतानाच पायलटवर हात उचलला होता.

 

 

यावेळी अगदी काही सेलिब्रिटींनी सुद्धा या प्रवाशाचे संतापाला योग्य ठरवले होते. मात्र एअलाईन कडून या प्रवाशावरच कारवाई करण्यात आली होती.

 

 

अशाप्रकारे जर प्रवाशाला नियम लागू केले जात असतील तर व्यवस्थापनेतील अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी सुद्धा या रेल्वेच्या व्हायरल व्हिडीओवरून होत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *