वंचितच्या उमेदवाराची लोकसभा निवडणुकीतून माघार;काय घडले कारण?

The withdrawal of the candidate of the disadvantaged from the Lok Sabha elections; what happened because?

 

 

 

 

लोकसभेसाठी मतदारसंघांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी आहे. १४ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घोषित झाली असल्याची माहिती प्रफुल्ल लोढा यांनी दिली होती.

 

 

 

मात्र लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्यानंतर मी निवडून येऊ शकत नाही ही वस्तूस्थिती असल्याने मला दिलेली उमेदवारी मागे घेत असल्याची माहिती लोढा यांनी दिली.

 

 

 

जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे

 

 

 

करण पवार यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. यातच जळगाव लोकसभेतून वंचित बहुजन आघाडीकडून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी देण्यात आली होती.

 

 

 

 

प्रफुल्ल लोढा यांनी १४ एप्रिल रोजी प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी घोषित केली असल्याची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती.

 

 

 

मात्र पाच दिवसांमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये काही नागरिकांच्या भेटी घेतल्या असता नागरिकांनी असे लक्षात आणून दिले,

 

 

 

 

की माझ्यामुळे भाजपाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही माघार घ्यावी आणि मी खरोखर निवडून येणार नाही अशी शक्यता होती, त्यामुळेच मी लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

 

 

 

वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी प्रफुल्ल लोढा यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून सांगितले, की जळगाव लोकसभेतून मी निवडून येऊ शकत नाही.

 

 

 

त्यामुळे मी स्वतः कोणताही दबाव नसताना माघार घेत आहे. यावर आंबेडकर यांनी माझे कौतुकच केले त्यांनी सांगितले की उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तुम्ही माघार घेतलेली नाही, त्यामुळे तुम्ही मला धोका सुद्धा दिलेला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

 

यावेळी प्रफुल्ल लोढा यांनी सांगितले, की मी कोणत्याही दबावाला बळी न पडता माझी ही माघार आहे. मी मतदार संघामध्ये फिरलो असता माझ्यामुळे भाजपाचा उमेदवार निवडून येत असेल

 

 

 

 

तर मी माघार घेतलेली कधीही चांगली. याबाबत मी प्रकाश आंबेडकर यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आहे.

 

 

 

येणाऱ्या दोन दिवसात मी माझा निर्णय जाहीर करणार आहे. कोणत्या उमेदवाराला अथवा कोणत्या पक्षाला मी पाठिंबा द्यावा हे दोन दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती प्रफुल्ल लोढा यांनी दिली.

 

 

 

 

लोढा यांनी अचानक माघार घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना पाठिंबा दर्शविण्यात येणार अशी माहिती असून यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारला बळ नक्कीच मिळेल.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *