EVM मशीनवर रोहित पवारांचे खळबळजनक आरोप

Rohit Pawar's sensational allegations on EVM machines

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले. वाढलेल्या मतदानाचा फायदा महायुतीला झाल्याचे दिसून आले. पण या वाढलेल्या मतदानावर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातोय.

 

बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशिन यामध्ये 13 टक्के फरक दिसतोय. मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही मोठी वाढ झाली त्यासाठी गाड्या लागल्या असत्या.

 

लोकांची गर्दी दिसली असती, असे रोहित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे ईव्हीएम मशीनचे सर्वांसमोर पोस्टमार्टम करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

बहुतांश बूथवर मतदान निवडणूक लवकर संपलं होतं. भोसरीला 1 लाख मतदानाची वाढ झाली आहे. शिरुरमध्ये 71 हजार मतदानाची वाढ झाली. जिथे ही वाढ झाली तिथे महायुतीचा मतदार निवडून आलाय.

 

पोस्टलवर 56 टक्के दिसणारे भाजप ईव्हीएमवर 90 टक्क्यांवर गेलंय. ईव्हीएममध्ये 95 पैकी 51 मतदारसंघात ईव्हीएममध्ये जास्त मते आढळली.

 

काही मतदारसंघात उमेदवारांना मिळालेल्या मतांचा आकडा एखाद्या मशिनद्वारे केला असावा असे तज्ञांचे मत होते. ईव्हीएमची बॅटरी फूल चार्ज होती.

 

त्यावेळी बॅटरी जबरदस्त होती, असे स्पष्टीकरण देण्यात आले. मग काही ठिकाणी बॅटरी शून्यावर गेली, हे कसं? असा प्रश्न त्यांनी विचारला.

 

आमच्या उमेदवारांनी चांगला प्रचार केलाय. मोठ्या मार्जिनने हरले आहेत. निवडणूक आयोगाने आमची मागणी मान्य करावी. मोठे कॅमेरे लावून ईव्हीएम तपासणी करावी. इंटरनेटला कनेक्ट नसणारं पेजरदेखील हॅक होऊ शकत.

 

त्यामुळे आम्हाला ईव्हीएम तपासायच्या आहेत. अशाप्रकारे ईव्हीएम हॅक केले जाऊ शकतं, नक्कीच ईव्हीएममध्ये काहीतरी झालंय. तज्ञांच्या मदतीने ही तपासणी व्हायला हवी, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली.

 

लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानात झालेली वाढ ही अनैसर्गिक आहे. अनेक ठिकाणी मतदानात गडबड झाली असावी. आमच्या निकालासाठी 3-4 वर्ष लागतात आणि दुसरीकडे कोर्ट आमच्याकडे येऊ नका असे सुमोटो काढते.

 

वोटर टर्नआऊट अॅपकालपासून बंद आहे. संवेदशील ठिकाणी कॅमेराचे फुटेज आम्हाला मिळावे. ईव्हीएम मशिनचे पोस्टमार्टम सर्वांसमोर करा.

 

आम्ही तज्ञ आणू. हिम्मत असेल तर आम्ही सांगू ते ईव्हीएम समोर आणावे. काही मतदान मशिनने स्वत:केले असावे, असे उमेदवारांचे मत असल्याचे रोहित पवारांनी सांगितले.

 

महायुतीचे प्रवक्ते सांगत होते त्यापेक्षाही जास्त जागा त्यांना मिळाल्या. ईव्हीएम गुजरातमधून आणलं गेलं. या सर्वात लोकशाही अडकलीय, असे रोहित पवार म्हणाले. ईव्हीएम मशिनचे रिपोर्ट आम्हाला द्या,

 

अशी मागणी त्यांनी यावेळी केली. बऱ्याच ठिकाणी साडेपाच वाजता पोलिंग बंद झालं होतं. तरीसुद्धा 6 वाजण्याआधी मतदान का बंद केलं? याच उत्तर द्यायला हवं.लाडकी बहीण,

 

पैशांचा वापर यामुळे 4 टक्के मत इकडे तिकडे होऊ शकतात. पण 13 टक्के मतदान वाढणे हे संशयास्पद असल्याचे रोहित पवार म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *