खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ओवैसींचा ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा ;पाहा VIDEO

Owaisi's 'Jai Palestine' slogan after taking oath as MP; WATCH VIDEO

 

 

 

 

संसदेतील नवनियुक्त खासदारांच्या शपथविधी कार्यक्रम सुरू असताना एमआयएमचे खासदार अससुद्दीन ओवैसी यांनी दिलेल्या नाऱ्यानंतर उडाला.

 

 

 

अससुद्दीन ओवैसी यांनी खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय भीम, जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन असा नारा दिला.

 

 

 

या नाऱ्यानंतर भाजपच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेत त्याला विरोध केला. भाजप खासदारांच्या विरोधानंतर प्रोटेम स्पीकर यांनी संसदेच्या कामकाजातून ते हटवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.

 

 

 

18 व्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यादरम्यान त्यांनी संसदेत शपथविधी सोहळ्यात जय पॅलेस्टाईन म्हणत वाद निर्माण केला.

 

 

 

प्रोटेम स्पीकर यांनी अससुद्दीन ओवेसी यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावले. बिस्मिल्लाचे पठण करून ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली.

 

 

 

 

खासदार म्हणून शपथ घेताना त्यांनी ‘जय भीम, जय तेलंगणा’ आणि नंतर ‘जय पॅलेस्टाईन’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला.

 

 

 

 

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांना एकूण 6,61,981 मते मिळाली

 

 

 

आणि त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा 3,38,087 मतांनी पराभव केला. यापूर्वी 2019 च्या निवडणुकीत ओवैसी यांनी एकूण 58.95% मतांसह विजय मिळवला होता.

 

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य तसेच इतर नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी नव्या सदस्यांना शपथ दिली.

 

 

 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत आले आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने 9 जून रोजी शपथ घेतली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *