महायुतीची बैठक सोडून नाराज एकनाथ शिंदे त्यांच्या गावाकडे

Angry Eknath Shinde leaves Mahayuti meeting, returns to his village

 

 

 

सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली.

 

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अमित शाह यांनी विविध सूचना दिल्या.

 

त्यानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक होणार होती. अमित शाहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती.

 

परंतु महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस महायुतीची ही बैठक होणार नसून महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा झाली होती.

 

यावेळी झालेल्या फोटोसेशनवेळी एकनाथ शिंदे यांची देहबोली चर्चेचा विषय ठरली होती. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो काढताना एकनाथ शिंदे यांचे खांदे पडलेले होते

 

आणि त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह दिसत नव्हता. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले होते.

 

मात्र, त्यांचा पडलेला चेहरा दिल्लीतील राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे.

 

राष्ट्रवादीत सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल,तर शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातल्या नव्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास एकनाथ शिंदेंनी ते स्वीकारावं अशी गळ शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना घातल्याची माहिती आहे.

 

एकनाथ शिंदेंची ठाण्यातली पत्रकार परिषद झाल्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदेंना तशी विनंती केल्याचं समजतं. काल दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिंदेंची शिवसेनेच्या काही नेत्यांसोबत बैठक झाली.

 

आपण सत्तेत राहूनच सरकार चालवावं असा सूर शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंसोबतच्या बैठकीत आळवला. त्यामुळं एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी गेले आहेत.

 

या भेटीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पण या दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यात महायुती सरकार पुन्हा आले. त्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची बदली मात्र झालं असून ते भाजपच्या वाट्याला जाणार हे नक्की झालं आहे.

 

त्यामुळे राज्याचा कारभार सध्या काळजीवाहू मुख्ममंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच पाहत आहेत. आता त्यांच्या भेटीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनियुक्त आमदार जितेंद्र आव्हाड पोहोचले आहेत.

 

या आधी गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळीही या दोन नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा झाली होती.

 

त्यानंतर आता पुन्हा जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट आहे.

 

अजित पवार अर्थमंत्री असताना अनेकदा मागणी करूनही त्यांनी आपल्याला निधी दिला नव्हता अशी तक्रार या आधी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

 

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या बाजूलाच राहतात त्यामुळे त्यांनी आपल्याला अनेकदा मदत केली होती असंही त्यांनी सांगितलं होतं.

 

आताही महायुती सरकारमध्ये अर्थमंत्रिपद हे अजित पवारांकडे जाणार हे निश्चित झालं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या वाट्यालाही महत्त्वाची खाती येण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सगळ्यांचं लक्ष गुरुवारी अमित शाहांच्या घरी पार पडलेल्या बैठकीकडे होतं.

 

देवेंद्र फडणवीसच नवे बॉस असतील असं गल्लीपासून दिल्लीपर्यंत ठोस सांगितलं जातंय. मात्र अद्याप महायुतीकडून तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसंच भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक प्रलंबित आहे. ज्यात भाजप विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल.

 

अमित शाहांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर शुक्रवारी मुंबईत महायुतीची बैठक होणार असल्याचं स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं होतं.

 

मात्र स्वतः एकनाथ शिंदेच साताऱ्यातील दरे गावाला जाणार असल्यानं ही बैठक लांबणीवर पडली आहे. दोन दिवसांनी म्हणजे शिंदे मुंबईत परतल्यानंतर ही बैठक होणार

 

असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. शिंदेंच्या दरे गावच्या दौऱ्यामुळे सरकार स्थापनेच्या प्रक्रियेचा वेग काहीसा मंदावलाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

 

नवीन मंत्रीमंडळात कुणाला किती मंत्रीपदं मिळण्याची शक्यता
भाजप – 20
शिवसेना – 12 ते 13
राष्ट्रवादी – 9 ते 10

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *