ठाकरे गटाकडून थेट अमित शाहांना घेरण्याचा प्रयत्न

An attempt by the Thackeray group to surround Amit Shah directly

 

 

 

उपराजधानीत न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणाची एसआयटी लावावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.

 

 

 

सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून सातत्याने दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटीद्वारे चौकशीची मागणी होत आहे. प्रत्यक्षात या प्रकरणी अनेक चौकशा झाल्या आहेत.

 

 

 

त्यात काहीही आढळलेले नाही. दिशा सॅलियन यांच्या कुटुंबीयांचीदेखील काही तक्रार नाही. चौकशीच करायची असेल तर नागपूरात न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

 

 

 

त्यांच्याही कुटुंबीयांची या प्रकरणात काही तक्रार नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूची एसआयटी करून सत्य बाहेर यावे, असे अंबादास दानवे म्हणाले.

 

 

दिशा सॅलियनप्रकरणी सरकारने एसआयटी गठीत केली आहे. त्यापूर्वी अडीच वर्षे तुमची सत्ता होती. तेव्हा तुम्ही न्यायमूर्ती लोया प्रकरणी एसआयटी का लावली नाही, असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला.

 

 

 

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या घरी झालेल्या पार्टीची माहिती अनिल परब यांनी दिली होती. तसेच या प्रकरणी मी जे आरोप करतोय,

 

त्यावरील चौकशीसाठी मलादेखील बोलवावे. जेणेकरून दुधका दुध और पानीका पानी होईल, असेदेखील आमदार नितेश राणे म्हणाले.

 

 

तर दुसरीकडे शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला थेट इशारा दिला आहे. आम्ही सांगू तेव्हा तुमच्याही कुटुंबाच्या एसआयटी चौकशा लावू, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ते विधिमंडळाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

 

 

 

उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्यांच्यापासून भीती असते, त्यांच्यावर आरोप केले जातात. पण, आम्हालाही एसआयटी चौकशा लावता येतील. त्यामुळे त्यांनी त्याच्यात जाऊ नये. अन्यथा आम्ही सांगू तेव्हा तुमच्या कुटुंबीयांची एसआयटी चौकशी लावू.”

 

 

“शिवसेनेच्या खासदारांनी मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. ज्यांना आरक्षण असेल, त्यांना आरक्षण द्यावे. पण, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे,” अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

 

 

प्रफुल्ल पटेलांवरून उद्धव ठाकरेंनी भाजपाला घेरलं आहे. “नवाब मलिकांना दूर ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होतं. तोच न्याय प्रफुल्ल पटेलांबाबत लावणार आहात की नाही?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *