परभणीत बंदला हिंसक वळण,जाळपोळ ,दगडफेक हिंसक घटनांमुळे शहरात तणाव
Bandh turns violent in Parbhani, arson, stone pelting incidents create tension in the city
काल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर परभणी शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी आज बुधवारी बंदची हाक देण्यात आली.
बंदच्या दरम्यान परभणी शहरात मोठ्या प्रमाणात तोडफोड,दगडफेकीच्या घटना घडल्या ठिक ठिकाणी रास्तारोको करण्यात आले. दुपारच्या सुमारास आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने शहरात ठिक ठिकाणी
जाळपोळीच्या घटना घडल्या. दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. आंदोलना दरम्यान स्टेशन रोड परिसरात आंदोलनकर्ते व पोलिस आमने – सामने झाले. जमावाला काबूत करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या
बिघडत असलेली परिस्थितीती पाहून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवारी दुपारी वाजल्यापासून परभणी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागु केले .
आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी परभणी बंदची हाक दिली होती. सकाळच्या सुमारास ठिक ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दुपारी १२.३० नंतर परभणी शहरातील आंदोलन हिंसक झाल्याचे दिसून आले.
आंदोलनकर्त्यांनी ठिक ठिकाणी दगडफेक केली. जाळपोळीच्या घटना घडल्या. बसस्थानक परिसरात तोडफोड करत फळांचे गाडे उलथून नाल्यात टाकण्यात आले.
शहरातील औषधी दुकान व इतर दुकानांचे काच फोडण्यात आले. स्टेशनरोड, आर.आर. टावर, शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार आदी भागात जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक केली,वाहने फोडण्यात आली.
तर जमावाकडून काही वाहने जाळण्यात आली. स्टेशन रोड भागात आंदोलनकर्ते, पोलिस आमने – सामने आले. यावेळी दगडफेक झाली. आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या.
प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून शांतता राखण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांना करण्यात आले आहे.कालपासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना सुरुवात झाली
आज विविध अभ्यासक्रमाचे पेपर होते सकाळच्या सत्रात विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचे मात्र पेपर संपण्याच्या पूर्वीच शहरात ठिकठिकाणी जाळपोळ,दगडफेकीच्या घटना घडल्यामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली
अश्या परिस्थितीत परीक्षार्थी विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी कोणतंच वाहन उपलब्ध नव्होते ,ज्यांच्याकडे वाहने होते ते जीव मुठीत घेऊन शहरातून मार्ग काढत होते कारण ठिकठिकाणी जमाव गाड्या उभ्या करून तोडफोड करत होता
अपुरे पोलीस बळ असल्यामुळे विद्यार्ह्यांच्या पालकांकडून पोळ्या परीक्षार्थी पाल्याला घरी परत आणण्यासाठी मोठी जोखीम घ्यावी लागली,दुपारच्या सत्रातील पेपर २ वाजता सुरु होणार होता
या काळात शहरात संचारबंदीसारखी परिसथिती होती शहरात कोणतीच वाहने रस्त्यावर धावत नहोती ,
ठिकठिकाणी जमावाकडून गाड्या अडवून तोडफोड करण्यात येत होती अश्या परिस्थितीत विद्यार्ती परीक्षा केंदारवर पोहोचू शकले नाहीत,
विद्यापीठाकडून दक्षता म्हणून आजची परीक्षा स्थगित करणे आवश्यक होते मात्र प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले नाही त्याचा फटका विद्यार्थ्या बसला .
विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाबाबत विद्यार्थी पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून आजचा पेपर पुन्हा एकदा घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
आज बंदचे आवाहन करण्यात आल्यामुळे सर्व शाळा सकाळपासूनच बंद ठेवण्यात आल्या होत्या . सध्या परभणी शहरात तणावपूर्ण शांतता असून रात्रीतून काही घडल्यास पुन्हा परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी शहर व जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 लागू करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे एका इसमाने नुकसान केल्याने
शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यामुळे जिल्ह्यात कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी आदेश लागू असूनही या आदेशास न जुमानता आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नागरिक एकत्र जमा होत आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिक गटा-गटाने एकत्र येत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील कालावधीत शहरासह जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण होवू नये, यासाठी सदर आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले आहे.
आदेशान्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार परभणी शहर व जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
तसेच सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके व इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे आदेश कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत. हे आदेश आज बुधवार, (दि.11) रोजी दुपारी 1 वाजेपासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील.
तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्याने हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलिसांनी जाहीर करण्याचेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नमूद केले आहे.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची करण्यात आलेल्या अवमानाच्या पार्श्वभूमीवर
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. कुणीही कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करु नये व कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे त्यांनी सांगितले.