बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून 114 कोटींची उलाढाल

Turnover of 114 crores from the accounts of unemployed youth

 

 

 

महाराष्ट्रात मोठा गैरव्यहार फघडकीस आला आहे. मालेगाव येथील मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत 114 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

 

बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून 114 कोटींची उलाढाल करण्यात आली आहे. देशातील 21 राज्यांमधून मालेगावच्या बँकेत पैसे वर्ग करण्यात आले आहेत. कोल्हापूर बँकेच्या वेगवेगळ्या खात्यातून 1 कोटी 90 लाख वर्ग करण्यात आलेत.

नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून 114 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकील आला आहे.

 

या व्यवहारात एकूण 21 राज्य सहभागी आहेत. 21 राज्यांमधील 10 बँकांमधून मालेगावच्या या बँकेमध्ये दहा कोटी वर्ग करण्यात आले होते. कोल्हापूर येथील

 

बँकेच्या वेगवेगळ्या खात्यातून एक कोटी 90 लाख नागपूर मुंबई पुणे येथील शाखांमधून वीस लाख असे करत कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा समोर आला आहे.

 

सिराज मोहम्मद आणि त्याच्या गँगने मालेगावात हिंदू तरुणांना फसवून त्यांचे नाव बोगस कंपन्या स्थापन करून त्यांच्या नावावर 100 कोटी रुपये मागविण्यात आले.

 

या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. फसवणूक करून काढण्यात आलेली 114 कोटी रुपयांची रक्कम मालेगाव मधुन. व्होट जिहादचा प्रचार व प्रसार करणाऱ्या नेते,

 

संस्था संघटना यांना वितरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केली. सोमय्या यांनी आज पुन्हा मालेगावात बँक 100 कोटी फसवणूक झालेल्या प्रकरणातील तरुण व तक्रारदार यांची भेट घेतली.

 

तत्पूर्वी सोमय्या यांनी मालेगाव अपर पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून या घोटाळ्यातील तपासाबाबत बंद दाराआड चर्चा केली.तर नाशिक मर्चंट बँक व महाराष्ट्र बँकेला भेट देवून माहिती घेतली होती.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *