मंत्रिपदावरून शिंदे गटात अस्वस्थता वाढली , चार बडे नेते नाराज, एकाचा राजीनामा

Unrest increases in Shinde faction over ministerial post, four big leaders unhappy, one resigns

 

 

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या 11 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात आधी मंत्री असलेल्या अनेक बड्या नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे.

 

त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील नेते अस्वस्थ असल्याची बातमी समोर येत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे नेत्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या पवनी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी काल उघड नाराजी व्यक्त केली होती.

 

तसेच त्यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देखील दिला. त्यांचं पक्षात काहीच योगदान नाही अशांंना देखील मंत्रिपद मिळालं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत,

 

त्यांना देखील मंत्रिपद मिळालं, जर मला जनतेला न्याय देता येत नसेल तर पदावर राहून काय उपयोग असा सवाल नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे.

 

दरम्यान नरेंद्र भोंडेकर यांच्याप्रमाणाचे विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे आणि तानाजी सावंत हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे, विजय शिवतारे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

 

विश्वासात न घेता मंत्रिमंडळ विस्तार झाला, आता आडीच वर्षांनी जरी मंत्रिपद मिळालं तरी मी घेणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे प्रकाश सुर्वे देखील नाराज आहेत.

तानाजी सावंत यांच्याकडे गेल्यावेळी आरोग्य खातं होतं. मात्र यावेळी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

 

मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज झाले आहेत. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला न थांबता ते पुण्यातील बालाजी नगर येथील कार्यालयात परतले आहेत.

 

माध्यमांसमोर येण्यासाठी तानाजी सावंत यांनी नकार दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं शिवसेना शिंदे गटातील नेते नाराज आहे, आता त्यांची नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशी दूर करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता.

 

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? नव्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.

 

या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळू शकली नाही. काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली.

यामध्ये भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. शिवसेना शिंदे गटाच्या 11 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात नागपूरमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.

 

मात्र मंत्रिपदासाठी अनेक आमदार इच्छूक होते, आपल्यालाही मंत्रिपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. पंरतु त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा देखील समावेश आहे.

 

त्यामुळे आता या नेत्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. एकनाथ शिंदे गटाकडून यावेळी तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर या बड्या नेत्यांना यावेळी मंत्रिपद देण्यात आलं नाही.

 

दरम्यान तानाजी सावंत यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघात प्रचार सभा घेतली होती. या प्रचार सभेत तानाजी सावंत यांना शिंदेंनी मंत्रिपदाचा शब्द दिला होता.

 

तानाजी सावंत यांना मंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं. ‘तानाजीरावांना तुम्ही आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी’

 

असं एकनाथ शिंदे यांनी भरसभेत म्हटलं होतं. मात्र आता तानाजी सावंत यांचं मंत्रिपद हुकलं आहे. मंत्रिपद मिळालं नसल्यानं तानाजी सावंत नाराज असल्याची बातमी समोर येत आहे.

 

रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. शिवसेनेकडून दीपक केसरकर,

 

अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि विजय शिवतारे यांचा मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे आता शिवेसना शिंदे गटात नाराजी असल्याचं समोर येत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *