नाराज छगन भुजबळ आता नवीन पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार?
Will the angry Chhagan Bhujbal form a new party or join the BJP?
राज्यात महायुतीचा रविवारी मंत्रीमंडळ विस्तार पडला. यामध्ये काही नव्या आमदारांना संधी देण्यात आली आहे,
तर काही बड्या नेत्यांचा पत्ता कट केला आहे, त्यानंतर राज्यातील काही बड्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आत्तापर्यंत अनेक वेळा मोठमोठी पदे भुषवलेले छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केली,
रोष व्यक्त केला. भुजबळांनी देखील त्यांच्या भावना माध्यमांसमोर व्यक्त केल्या. आपल्या मतदारसंघात त्यांनी बैठका घेतल्या. त्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी
आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याबाबत सांगितल्याचं देखील दिसून आलं. या सर्व घडामोडी घडत असतानाच छगन भुजबळ यांनी आज एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बरेच काही सांगितले
आपण (छगन भुजबळ) भाजपसोबत जावं असं अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं. भाजपमध्ये तुमच्यासाठी सहानुभूतीची लाट आहे असं आपल्याला वाटतं का?
याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मला त्याबाबत कल्पना नाही. मात्र, आमच्या त्या मेळाव्यामध्ये काही जण म्हणाले,
विरोधी पक्ष पाहा, तर काहीजण म्हणाले स्वतंत्र पक्ष काढा. पण मोठ्या प्रमाणावर म्हणत होते की,
भाजपमध्ये जावा. लोकांच्या त्या भावना आहेत. विचार आहेत, मी त्यांना सांगितलं तुमचे विचार मी जाणून घेतले आहेत.
माझे इतर सहकारी आहेत. ओबीसी मधील जे समता परिषदेत आहेत. त्यांनी भेट घेतली. आमचे अनेक नेते,
कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करेन पण कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका. शांतता राखा, कोणाचा अवमान करू नका,
निषेध व्यक्त करणे लोकशाहीत अधिकार आहे. योग्य वेळेला मी निर्णय घेईन असंही छगन भुजबळ पुढे म्हणालेत.
भाजपमध्ये जाण्याला आपला नकार आहे का? या प्रश्नावर बोलताना भुजबळ म्हणाले, मी आत्ताच सांगितलं, चर्चा करून निर्णय घेईल.
तिकडे दार तर उघड पाहिजे, ‘मान-ना-मान मैं तेरा मेहमान’ असं होईल, तर भाजपमधून कोणी संपर्क केला का
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याच्यांशी आपलं बोलणं झालं असं आपण सांगितलं या प्रश्नावरती उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, दोन दिवस तर हाऊस बंद होतं, काल ते आले.
आता जे काही दोन ते तीन प्रश्न आहेत. तुम्ही कुठे आहात, कसे आहात, तुम्ही असं बोललात, तसं बोललात, त्यावर मी म्हणतो,
कब तक सहे एक अपमान हम, सुनते सुनते दिल ही थक जाता हैं, जब वार हो स्वाभीमान पर हर बार, तो सब्र का अंत हो जाता हैं. चूप रह कर क्या मिलता हैं आखिर, दिल का दर्द ही बढता हैं.
और फीर उठानी पडती हैं आवाज, जब पानी सर के उपर चढ जाता हैं, असं म्हणत छगन भुजबळ यांनी लवकरच आपला निर्णय घेईन असं सांगितलं आहे.
बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, आणि आता अजित पवार यांच्या विरोधात आवाज उठवला. ते छगन भुजबळ आपला स्वत:चा पक्ष काढण्याबाबत काही विचार करत आहेत का?
यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, स्वत:चा पक्ष काढणं ही काही सोपी गोष्ट नाही. गोपीनाथराव मुंडे यांनी देखील माझ्यासोबत याबाबत चर्चा केली होती. ते भाजपमध्ये होते आणि मी उपमुख्यमंत्री होतो.
चर्चा झाली होती. पण काही गोष्टींमुळे राहून गेलं, नंतर पाहू असं म्हणालो. या ओबीसी समाजामध्ये तीनशे चारशे जाती आहे, त्यांना सर्वांना एकत्रित आणणं.
त्यासाठी लागणारी साधन सामग्री या सर्वांसोबत ही गोष्ट किती शक्य आहे. ही सोपी गोष्ट नाही. सरकार येणार नसेल तर
मी ती फक्त रस्त्यावरची लढाई आहे. म्हणून मी सरकारमध्ये राहिलो. आम्ही आरक्षण मिळवलं, विद्यार्थ्यांसाठी काम केली, असं छगन भुजबळ म्हणालेत.