अमित शहांवर टीका भोवली ,पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांवर निलंबनाची कारवाई

Criticism of Amit Shah, suspension of all party spokespersons

 

 

गृहमंत्री अमित शहांनी संसदेत भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं विधान विरोधी पक्षांच्या रडारवर आहे. आंबेडकर यांचं नाव घेणं म्हणजे आता फॅशन झाली आहे.

 

इतक्यांदा देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्मांपर्यंत स्वर्ग मिळाला असता, असं शहा म्हणाले होते. त्यानंतर विरोधकांनी शहांच्या विधानावर सडकून टीका केली.

 

शहांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. भाजपप्रणित एनडीएमध्ये असलेल्या राष्ट्रीय लोक दलाच्या प्रवक्त्यांनीदेखील शहांच्या विधानाचा समाचार घेतला.

 

त्यानंतर आता पक्षाच्या अध्यक्षांनी सगळ्याच प्रवक्त्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईचा संबंध शहांवर करण्यात आलेल्या टिकेशी जोडला जात आहे.

 

केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष असलेल्या जयंत चौधरी यांनी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना आणि उत्तर प्रदेशच्या सगळ्या प्रवक्त्यांना निलंबित केलं आहे.

 

तत्काळ प्रभावानं ही कारवाई करण्यात आलेली आहे. आरएलडीचे संघटन महासचिव त्रिलोक त्यागी यांनी याबद्दलचं पत्र प्रसिद्ध केलं आहे.

 

जयंत चौधरी यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईचा संबंध अमित शहांशी जोडण्यात येत आहे.

 

गेल्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्रि अमित शहा देशाचं संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत होते. त्यावेळी त्यांनी आंबेडकर, आंबेडकर असा उल्लेख सहा वेळा केला.

 

आंबेडकर यांचं नाव घेणं म्हणजे आता फॅशनच झाली आहे, असं विधान शहांनी केलं. यानंतर काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष,

 

राष्ट्रीय जनता दलासह विरोधी बाकांवरील अन्य पक्षांनी शहांवर कडाडून टीका केली. शहांनी आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

शहांच्या निधनाचा निषेध करत काँग्रेस नेते, पदाधिकारी रस्त्यावर उतरले. राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती यांनी शहांवर शाब्दिक हल्ले चढवले.

 

यानंतर शहांनी एक पत्रकार परिषद घेतली. काँग्रेससह विरोधी पक्ष माझ्या विधानाची अर्धवट क्लिप शेअर करुन वक्तव्याची तोडमोड करत असल्याचा प्रतिवाद त्यांनी केला.

 

काँग्रेसनं बाबासाहेबांना दोनवेळा निवडणुकीत पराभव करण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप शहांनी केला.

 

राष्ट्रीय लोक दल केंद्रातील सरकारचा भाग आहे. पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी केंद्रात शिक्षण राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे कौशल्य विकास खात्याचा स्वतंत्र प्रभार आहे.

 

यानंतरही राष्ट्रीय लोक दलाचे प्रवक्ते कमल गौतम यांनीही विरोधकांच्या सूरात सूर मिसळत आंबेडकरांबद्दल शहांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *