दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा ; ५ फेब्रुवारीला मतदान, निकाल ८ फेब्रुवारीला

Delhi Assembly elections announced; Voting on February 5, results on February 8

 

 

 

नव्या वर्षात दिल्लीत निवडणूक होते आहे. दिल्लीत देशाचं चित्र एकवटलेलं पाहण्यास मिळते. प्रत्येक संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी होतं. दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा आहे

असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. दिल्लीमध्ये ७० विधानसभेच्या जागा आहेत. १.५ कोटी हून अधिक उमेदवार दिल्लीत आहेत. २.०८ लाख मतदार असे आहेत

 

जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे. ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली.

 

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु झाली आहे. या पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणुकीची आणि निकालाची तारीख जाहीर केली जाईल. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीला संपतो आहे.

 

२०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा ६ जानेवारीला झाली होती. आता आज निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी ही तारीख जाहीर केली आहे. तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.

 

१) उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची तारीख १७ जानेवारी २०२५
२) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २० जानेवारी
३) अर्जाची छाननी २८ जानेवारी

४) दिल्ली विधानसभा मतदानाची तारीख ५ फेब्रुवारी २०२५
५) दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाची तारीख ८ फेब्रुवारी
अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून लढवणार निवडणूक

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळीही नवी दिल्लीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याशी आहे.

 

केजरीवाल मागच्या दोन निवडणुकीत इथूनच जिंकून विधानसभेत आले. नवी दिल्ली ही VIP सीट आहे. भाजप आणि काँग्रेस दोघांनी आपल्या स्टार नेत्यांना उतरवलं आहे.

 

इथे सामना रंगतदार असणार आहे. मुख्यमंत्री आतिशी कालकाजीमधून विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या अलका लांबा आणि दक्षिण दिल्लीचे माजी भाजप खासदार रमेश बिधूडी यांच्याशी आहे.

 

खरंतर आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे झाल्याचं दिसून येतं आहे. अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख देशद्रोही असा केला होता.

 

त्यानंतर या प्रकरणावरुन दिल्लीचं राजकारण तापलेलं पाहण्यास मिळालं. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहल या घरावरुन मोदी आणि अमित शाह हे सातत्याने केजरीवालांवर टीका कत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार? हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे.

 

दिल्ली विधानसभेची निवडणूक आप या पक्षाने सलग दोनवेळा जिंकली आहे. भाजपाला ‘दिल्ली’ काबीज करायची आहे. त्यामुळे भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

 

तर दुसरीकडे काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात जावं लागल्याने त्यांनी आता लोक निवडून देतील तेव्हाच मी मुख्यमंत्री होईन असं म्हणत आतिशी यांना ते पद दिलं.

 

या दरम्यान काँग्रेस आणि आप बरोबर आहेत असं वाटत असतानाच अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटलं. दोन्ही पक्षांमधला वाद विकोपाला गेल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *