मोदींच्या जीवाला धोका,पोलिसांना फोन ,एकाला अटक
Threat to Modi's life, call to police, one arrested

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर येणार होते, त्यांचा आजचा दौरा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने रद्द झाला, मात्र, नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार असताना
पिंपरी चिंचवडच्या कंट्रोल रूमला मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा असा कॉल आला होता, या फेक कॉलमुळे पोलिसांची तारांबळ उडाली.
हा कॉल आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.
पंतप्रधानांच्या जीवाला धोका आहे, त्यांना वाचवा, असा कॉल पिंपरी चिंचवडच्या कंट्रोल रूमला फोन आला होता. पुणे दौऱ्यावर नरेंद्र मोदी येणार असताना हा कॉल आल्यानं पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.
मात्र तातडीनं त्या आयटी अभियंता तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे, तेव्हा मानसिक तणावाखाली त्याने ही तथ्यहीन माहिती दिल्याचं समोर आलं आहे.
आज सकाळी सात ते साडे सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यानंतर मोदींनी पुण्याचा दौरा रद्द केल्याची खबर आली आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास या तरुणाने हा फेक कॉल केला होता, त्यानंतर पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली. फोन करणारी व्यक्ती वाकड पोलिसांच्या हद्दीतील होती,
सकाळी साडे सातच्या सुमारास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. फोन करणारा तरुण हा आयटी अभियंता निघाला, तो मानसिक तणावात असल्याचं दिसून आलं.
त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका आहे, याबाबत मंत्रालयाला कळवावे. हे तू कशाच्या आधारावर सांगितले? यावर त्याने मोदींच्या अमेरिका दौऱ्याचं कनेक्शन जोडलं.
अमेरिकेत मोदी गुगलच्या सीईओना भेटले, अशातच आर्टिफिशियल इंटिलिजेंस फिचरवरून काहीही घडतं. हे मी ऐकलंय, त्यामुळं मोदींच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
असं मला वाटतं. त्याने दिलेल्या उत्तरात काहीच तथ्य नसल्याचं आणि काहीही अवांतर बोलत असल्यानं तो मानसिक तणावात असल्याचं पोलिसांना दिसून आलं.
दरम्यान मोदींच्या जीवाला धोका आहे, असा कॉल करणारा हा अभियंता हा मूळचा उदगीरचा असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता,
कंपनीने त्याला नोटीस पिरेडवर ठेवलं आहे. त्यामुळं तो मेंटली डिस्टर्ब असल्याचं कळलं. यावरून हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं आहे.
आता वाकड पोलिसांनी त्याच्या भावाला बोलावले असून तथ्यहीन माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जात आहे. त्यानंतर त्याला त्याच्या भावाकडे सुपूर्त केलं जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. मोदींच्या हस्ते आज सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होते.
तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा करण्यात आला आहे.
हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.