मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक;पोलीसअधीक्षक,२ डीएसपी, ४ इन्स्पेक्टर निलंबित

Failure in Modi's security; Superintendent of Police, 2 DSP, 4 Inspector suspended

 

 

 

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या सुरक्षेचे मोठी चूक झाली होती. याप्रकरणी एकूण सात पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये फिरोजपूर जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक आणि दोन डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

 

 

गेल्या वर्षी 5 जानेवारीला सुरक्षा भंगाची घटना घडली होती. विधानसभा निवडणुकीच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी पंजाबला गेले होते.

 

 

पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलकांनी केलेल्या नाकेबंदीमुळे पंतप्रधानांचा ताफा सुमारे 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकून पडला होता.

 

 

यावरून भाजप नेत्यांनी तत्कालीन चरणजीत सिंह चन्नी सरकारवर निशाणा साधला होता. त्याचवेळी पंतप्रधानांच्या प्रवास योजनेत शेवटच्या क्षणी बदल करण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले होते.

 

 

सुरक्षा भंगाची चौकशी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने सुरक्षा भंगासाठी पंजाब सरकारच्या अनेक अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते.

 

 

भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने आता या त्रुटीबद्दल सात पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

 

 

याबाबतच्या आदेशात म्हटले आहे की, सर्व सात पोलिसांना पंजाब नागरी सेवा (शिक्षा आणि अपील) नियम, 1970 च्या नियम 8 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या नियमांतर्गत शिक्षा पदोन्नती रोखण्यापासून ते सेवेतून बडतर्फ करण्यापर्यंत असू शकते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *