भारताने शेख हसीना परत पाठविले नाही तर अडानीना बसणार मोठा फटका

If India does not send back Sheikh Hasina, Adani will face a big blow

 

 

 

 

भारत-बांग्लादेश संबंधात नवीन अध्याय सुरु करण्यासाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं प्रत्यर्पण आवश्यक आहे. हसीना भारतात राहिल्या,

 

तर दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध बिघडू शकतात असा इशारा बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सरचिटणीस मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी दिलाय.

 

BNP सत्तेवर आल्यानंतर अवामी लीग सरकारच्या काळातील वादग्रस्त अदानी वीज कराराची समीक्षा करेल. कारण यामुळे बांग्लादेशच्या लोकांच नुकसान होतय असं बीएनपी सरचिटणीस एका मुलाखतीत म्हणाले.

 

BNP चे वरिष्ठ नेते आलमगीर यांनी भारतासोबत मजबूत संबंधांची इच्छा व्यक्त केली. आमचा पक्ष मागचे मतभेद विसरुन सहकार्य करण्यास तयार आहे.

 

बांग्लादेशच्या भूमीवरुन भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशा कुठल्याही गोष्टीला आम्ही परवानगी देणार नाही हे सुद्धा आलमगीर यांनी स्पष्ट केलं.

 

अल्पसंख्यांकाची सुरक्षा हा बांग्लादेशचा अंतर्गत विषय असल्याच आलमगीर यांनी सांगितलं. हिंदुंवरील हल्ल्याचे रिपोर्ट चुकीचे असल्याच ते म्हणाले. कारण बहुतांश घटना राजकीय हेतूने प्रेरित आहेत.

 

शेख हसीना यांचं प्रर्त्यपण भारताने केलं नाही, तर दोन्ही देशातील संबंध बिघडतील असं मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर यांचं मत आहे.

 

“भारताने शेख हसीना यांना पुन्हा बांग्लादेशात आणण्याची व्यवस्था केली पाहिजे. असं झाल्यास बांग्लादेशातील जनतेच्या भावनाचा सम्मान होईल” असं आलमगीर यांनी म्हटलं आहे.

 

बांग्लादेश बाबत भारताची कुटनिती योग्य राहिलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला. फक्त अवामी लीगच नाही, बांग्लादेशच्या अन्य लोकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजेत.

 

 

बांग्लादेशात बीएनपी सत्तेवर आली, तर भारतासोबत चांगले संबंध आणि मागचे मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करेल असं आलमगीर म्हणाले.

 

शेख हसीना आणि अवामी लीग दोघेही टीकेस पात्र आहेत. त्याचं समर्थन केल्यास भारताची प्रतिमा आणखी खराब होईल असं बीएनपी नेता म्हणाला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *