राज्यसभेसाठी RBIचे माजी गव्हर्नर काँग्रेसकडून रघुराम राजन यांच्या नावाची चर्चा Former RBI Governor Raghuram Rajan’s name discussed by Congress for Rajya Sabha

Former RBI Governor Raghuram Rajan's name discussed by Congress for Rajya Sabha ​

 

 

 

 

 

महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या सहा जणांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे या सहा जागांसाठी निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी

 

 

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं नाव चर्चेत आहे. काँग्रेस किंवा महाविकास आघाडी रघुराम राजन यांना राज्यसभेवर पाठवू शकते.

 

 

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी ३१ जानेवारीला मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी इन्स्टाग्राम पोस्ट केली. ‘

 

 

आमच्या निवासस्थानी रघुराम राजन यांचा पाहुणचार करणं आनंददायी होतं,’ असं आदित्य ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. ‘आरबीआयचे गव्हर्नर म्हणून विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या.

 

 

 

आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं योगदान मोलाचं आहे. भविष्यचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या अशा व्यक्तींनी भारतीय अर्थव्यवस्थेचं नेतृत्त्व करायला हवं,’ असं आदित्य यांनी पुढे म्हटलं.

 

 

 

येत्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस रघुराम राजन यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे. ठाकरे गटातील एका नेत्यानं याबद्दलचे संकेत दिले.

 

 

 

राजन यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यामुळे त्यांनी याच संदर्भात शिष्टाचाराचा भाग म्हणून उद्धव ठाकरेंची भेट घेतली असावी, असं ठाकरे गटातील नेता म्हणाला.

 

 

 

आदित्य ठाकरेंनी रघुराम राजन यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला. त्यानंतर रघुराम यांच्या राज्यसभा उमेदवारीची चर्चा सुरू झाली.

 

 

 

त्यानंतर राजन यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. ‘माध्यमांमध्ये माझ्या भेटीची आणि राज्यसभेच्या जागेची चर्चा सुरू आहे. मी त्याबद्दल कोणत्याही पक्षाशी

 

 

चर्चा केलेली नाही. मी अभ्यासक आहे, राजकारणी नाही,’ अशा शब्दांत राजन यांनी लिंक्डइनवर त्यांची भूमिका मांडली.

 

 

 

विविध पक्षांच्या नेत्यांशी मी सध्या चर्चा करत आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेकडून भविष्यात त्यांच्या असलेल्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे,

 

 

 

असं रघुराम राजन यांनी लिंक्डइनवर म्हटलं आहे. राजन यांनी विविध आर्थिक विषयांवरुन मोदी सरकारवर अनेकदा टीका केली आहे.

 

 

दरम्यान राज्यसभेच्या ५६ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला. हे मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

 

 

 

 

काँग्रेसकडे असलेले संख्याबळ पाहता त्यांचा एक उमेदवार निवडून आणण्यासाठी चार ते पाच मतांची गरज लागू शकते. दरम्यान, या वेळी उमेदवार राज्यातूनच हवा असा सूर पक्षातील नेत्यांकडून उमटत आहे.

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसकडून विभागनिहाय आढावा बैठका घेतल्या जात आहेत. सोमवारी लातूरमध्ये बैठक झाली. राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित होती.

 

 

 

बैठकीदरम्यानच राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याचे कळाले. साहजिकच उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. राज्यात यंदा विधानसभा निवडणुकाही व्हायच्या आहेत.

 

 

गेल्या पावणेचार वर्षांपासून बहुतांश महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका झालेल्या नाहीत. त्या आधी लोकसभा निवडणूक होणार आहे.

 

 

या सर्व घडामोडींचा विचार करता काँग्रेसमधून या वेळी राज्यसभेसाठी राज्यातूनच उमेदवार द्यावा, अशी चर्चा काँग्रेसजनात होऊ लागली आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, की मागे राज्यसभा निवडणुकीसाठी बाहेरच्या उमेदवारांना संधी दिली गेली.

 

 

या वेळी मात्र राज्यातीलच उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यातही पक्षात सक्रिय असलेल्या उमेदवाराची वर्णी लावणे क्रमप्राप्त आहे. आगामी वर्षभर होणाऱ्या निवडणुका आणि पक्षबांधणीच्या दृष्टीने

 

 

 

उमेदवार निवडीचा सकारात्मक संदेश पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. श्रेष्ठींकडून याबाबत निश्चित योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

राज्यसभेसाठीचा उमेदवार कोणत्या विभागातून निवडला जाणार या विषयी तर्कवितर्क लढविणे सुरू झाले आहे. लोकसभा जागावाटपात काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ मित्रपक्षाला दिले,

 

 

तर त्या मतदारसंघातील उमेदवारास पक्षाकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अर्थात याबाबत आगामी आठवडाभरात निर्णय होण्याची शक्यता या सूत्रांनी वर्तविली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *