मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप;धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांचा खून करायला लावला
Manoj Jarange's sensational allegation; Dhananjay Munde ordered Santosh Deshmukh to be murdered
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोकाचा गुन्हा दाखल झाल्याने परळीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
दोन दिवस कडकडीत बंद केलाय. सर्वत्र वातावरण पेटलेलं असताना मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचा खून धनंजय देशमुख यांनी करायला लावल्याचा संशय आता येऊ लागल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाईम्ससोबत बोलताना जरांगेंनी हा आरोप केला आहे.
वाल्मिक कराड सुटायला नको, बीडची केस अंडर ट्रायल चालवण्यात यावी. बीड मधील हत्या धनंजय मुंडे यांनी करायला लावली असा आम्हाला संशय आहे.
खंडणीतून झालेल्या खून मध्ये धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे. खंडणीतले आरोपी, खुनातील आरोपी यांनी कोणाला फोन केले,
कोणाला भेटले हे सगळं चार्जशीट मध्ये यायला पाहिजे असं देखील जरांगे पाटील म्हणालेत. ना जातीचं देणं घेणं नाही, फक्त पैसे पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी खंडणी आणि खुनातील सगळ्या आरोपींवर मकोका आणि 302 कलम लावला असं म्हणत हे पाप धनंजय मुंडेंचं आहे,
पाप झाकण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींना मध्ये घेतोय असा हल्लबोल जरांगे यांनी मुंडे यांच्यावर बीड प्रकरणावरून केलाय. गुंडांच्या बाजूने कोणी आंदोलन करतं का असा संतप्त सवाल जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना उद्देशून केलाय.
धनंजय मुंडे तू आम्हाला खेटलास, संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही सोडत नाही असं देखील जरांगे यांनी स्पष्ट केलंय. परळीत धनंजय मुंडेंच्या टोळीने आंदोलन सुरू केलं म्हणून तुम्ही जर तपासात खोडा आणला, तर आम्ही पण 10 पट आंदोलन उभं करू असा इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
धनंजय मुंडेंची टोळी उघडी पाडायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट केली पाहिजे. ती म्हणजे एक गुप्त चौकशी परळीमध्ये जाण गरजेचं आहे. याच्यामध्ये जातीचा काही संबंध नाही.
खंडणीमधील वाल्मिक कराड पिक्चरमध्येच नाही, मीडियासमोर नाही, मोठ्या इव्हेंटमध्ये नाही ना कोणत्या कार्यक्रमामध्ये नाही. जिकडे कॅमेरे नसतील तिकडे हा, धनजंय मुंडेंनी सांगून ठेवलेलं का, तू खून कर, तू खंडणी माग,
सरकारी योजना हडप, हप्ते माग मी आहे तुझ्यामागे, हे तपासण्यासाठी गुप्त यंत्रणा तयार केली पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.