परभणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे राष्ट्रीय मतदार दिना निमित्य निवडणूक आयोगाच्या पक्षपाती भूमिकेचा निषेध

Parbhani City and District Congress Committee condemns the biased stance of the Election Commission on the occasion of National Voters' Day

 

 

 

राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या पक्षपाती भूमिकेचा परभणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे निषेध करण्यात आलेला आहे

 

परभणी जिलाधिकार्यांना निवेदन देऊन काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला आहे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात परभणी शहर,जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक घेण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे .

 

राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणुकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दिले आहेत. लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्य साधारण महत्त्व आहे ,

 

देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, आणि निवडणुकीत मतदार हा राजा असतो ,परंतु मागील काही वर्षातील निवडणूक आयोगाची भूमिका पाहता ती पक्षपाती दिसत आहे.

 

महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकार्य, अविश्वासनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसते.

 

राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजप युतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते.

 

अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते ,यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही . मतदार यादीमध्ये घोटाळा करण्यात आला . या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले,

 

त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला ,लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल पन्नास लाख मतांची वाढ कशी झाली ?

 

मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी त्यामध्ये मोठी तफावत आहे.

 

यातही 76 लाख मतदान वाढलेले दाखवले, हे सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था होती त्यामुळे मतदार संघातील मतदार यादीतील घोळ रात्रीचे अंधारात वाढलेले 76 लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावे ,

 

अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत ती माहिती देण्यात आलेली नाही. राज्यातील मतदारांचाही विधानसभेच्या निकालावर विश्वास बसलेला नाही आपले मतदान चोरले गेल्याची भावना जनतेत आहे जनतेची ही भावना महत्वाची आहे ,

 

आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे या दिवसाची औचित्य साधून काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश करत आहे .

 

निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वाहार्ता अबाधित राहील याकडे निवडणूक आयोगाचे लक्ष द्यावे ,

 

अशी मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदन करण्यात आलेली आहे. यावेळी माजी आमदार सुरेश वरपुडकर , नदीम इनामदार अध्यक्ष परभणी जिल्हा शहर काँग्रेस कमिटी,

 

माजी खासदार तुकाराम रेंगे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, बाळासाहेब देशमुख ,उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ,भगवान वाघमारे माजी उपमहापौर शहर महानगरपालिका ,

 

रामभाऊ घाडगे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,इरफान उर रहमान खान, बाळासाहेब फुलारी, दिगंबर खरवडे,सत्तार पटेल ,अब्दुल सहित, वैजनाथ देवकते ,विशाल बुधवंत, सुहास पंडित, नागनाथ काकडे ,आरएस देशमुख यांची उपस्थिती होती

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *