संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक
Throwing slippers on Sanjay Raut's car
शनिवारी गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाल्यानंतर रविवारीदेखील संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक झाल्याची घटना घडली आहे.
सोलापूरमध्ये चप्पलफेकीची घटना घडली असून हा प्रकार नेमका कुणी केला, याबाबत स्पष्टता नाहीये. ज्या कार्यकर्त्यांनी चप्पलफेक केली त्यांनी ‘नारायण राणे जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याची माहिती आहे.
संजय राऊत यांच्या गाडीवर केवळ चप्पल फेकलेली नसून चप्पलांनी भरलेली पिशवी फेकण्यात आल्याची माहिती आहे. संजय राऊत हे रविवारी सकाळपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी सोलापूरमध्ये हजर होते.
रविवारी संध्याकाळी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉलेटलच्या उद्घाटनासाठी यांनी हजेरी लावली. कार्यक्रम आटोपून परतत असताना पुलावरुन अज्ञात कार्यकर्त्यांनी चपलांनी भरलेली राऊतांच्या गाडीच्या दिशेने फेकली.
यावेळी त्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचं सांगितलं जात आहे. पोलिस त्या कार्यकर्त्यांचा शोध घेत आहेत. कार्यक्रमांच्या आयोजकांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं.
दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर काल पुण्यात मराठा आंदोलकांनी चप्पलफेक केली. या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. या घटनेनंतर काही ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. तर या प्रकणावर प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान बारामती येथील विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोपीचंद पडळकर चप्पलफेक प्रकरणावर भाष्य केलं.
‘प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. असे जे प्रकार घडत चालले आहेत. असेच जर प्रकार घडत गेले, तर सद्यस्थितीत गंभीर प्रश्न निर्माण होतात’.
‘काही लोकांच्या भावना होत्या, त्यामुळे ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती. मात्र आता हा प्रश्न संपलेला आहे. भविष्यकाळात अशा घटना होऊ नयेत यामुळे दक्षता घेतली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
नाना पटोले यांच्या आरोपावर भाष्य करताना विखे पाटील यांनी भाष्य केलं. ‘विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आरोप करणाऱ्यांची मालिका पाहिली,
तर फक्त ते मोघम स्वरूपाचे आरोप करत आहेत. केवळ संशय निर्माण करत आहेत. एखाद्या मंत्र्यांचे नाव घेण्यापेक्षा त्यांनी त्या मंत्र्याचं नाव जाहीर करावं. याबाबत त्यांना कोणी अडवला आहे का? असा सवालही विखे पाटील यांनी केला.
रोहित पवारांनी केलेल्या आरोपावरही विखे पाटील यांनी भाष्य केलं. ‘रोहित पवार केव्हापासून राज्याचे नेते झाले आहेत. आम्ही त्यांच्या प्रतिक्रियेवर भाष्य करण्याची आवश्यकता आहे? असा प्रश्न करत विखे पाटील यांनी टोला लगावला.