सावधान ; बँका परस्पर कपात आहे तुमच्या बँक खात्यातून पैसे ?

Beware; Is there a mutual bank deduction for money from your bank account? ​

 

 

 

 

SBI आणि Canara सह अनेक बँकांच्या ग्राहकांनी तक्रार केली आहेत की, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा (PMJJY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा (PMSBY) योजनेचे पैसे

 

 

त्यांच्या परवानगीशिवाय खात्यातून कापले गेले आहेत. या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांकडून सोशल मीडियावर बँकेकडे तक्रारीही केल्या जात आहेत.

 

 

मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली होती. या दोन्ही योजनांमध्ये वार्षिक प्रीमियम ग्राहकांच्या बँक खात्यातून भरला जातो.

 

 

या योजनेत राहण्यासाठी दरवर्षी प्रीमियम भरून त्याचे नूतनीकरण करावे लागते. मात्र नियमानुसार यासाठी ग्राहकांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

 

 

SBI खातेधारक सिबानंद पांडा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, बँकेने त्यांच्या संमतीशिवाय PMJJBY विमा योजनेसाठी खात्यातून रक्कम कापली आहे.

 

 

या योजनेसाठी मी अर्ज केला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, आणखी एक SBI ग्राहक, प्रणव महतो यांनी सांगितले की, त्यांचे बचत खाते त्यांच्या परवानगीशिवाय PMJJBY मध्ये नोंदणी केले गेले आहे.

 

 

 

ग्राहकांच्या तक्रारींबाबत कॅनरा बँकेशी संपर्क साधला तेव्हा बँकेने सांगितले की, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाच्या अंतर्गत ग्राहकांच्या खात्यातून पैसे वजा होत आहेत

 

 

 

याच्या काही तक्रारी बँकेकडे आल्या आहेत. या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे, ग्राहकांच्या चिंता दूर करण्यासाठी बँक काम करत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *