संसद सभागृहातील घुसखोरांकडे होता ‘प्लॅन बी’;पोलीस तपासात माहिती उघड

Parliament House Infiltrators Had 'Plan B'; Police Investigation Reveals Information

 

 

 

 

लोकसभा सभागृहात घुसखोरी करणाऱ्यांचा प्लॅन बी तयार होता अशी माहिती मिळत आहे. प्लॅन ए चुकला किंवा काही कारणांमुळे अपयशी ठरला

 

तर प्लॅन बी देखील तयार होता अशी कबुली लोकसभेची सुरक्षा भेदणाऱ्या एका प्रमुख सूत्रधाराने पोलिसांच्या चौकशीमध्ये दिली आहे.

 

प्रमुख सूत्रकार ललित झा पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. यावेळी झा अनेक खुलासे करत आहे. झा याने सांगितलं की, काही अडथळ्यांमुळे निलम, अमोल

 

 

जर संसदेत घुसण्यास अपयशी ठरले असते. तर प्लॅन बी तयार होता. अशावेळी महेश आणि कैलाश यांनी दुसऱ्या मार्गातून संसदेत प्रवेश केला असता आणि त्यांनी कलर बॉम्ब पेटवून पत्रकारांसमोर घोषणा दिल्या असत्या.

 

 

 

महेश आणि कैलाश हे विशाल शर्मा याच्या गुरुग्राम येथील घरी पोहोचण्यास अपयशी ठरले असते, तर अमोल आणि निलम यांना कोणत्याही परिस्थितीची मिशन पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, अशी माहिती झा याने पोलिसांना दिली आहे.

 

 

 

बुधवारी देशाच्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. २००१ च्या संसदेवरील हल्याच्या स्मृतिदिनीच असा प्रकार घडून आला.

 

 

सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी पब्लिक गॅलरीतून लोकसभा चॅम्बरमध्ये उड्या टाकल्या. यावेळी त्यांनी गॅस कॅन फोडली आणि घोषणाबाजी केली. काही खासदारांनी आरोपी तरुणांना ताब्यात घेत मारहाण केली.

 

 

याच दरम्यान, अमोल आणि निलम संसदेबाहेर आंदोलन करत होते. त्यांनी गॅस कॅन फोडल्या आणि घोषणाबाजी सुरु केली. त्यांचा प्लॅन ए यशस्वी ठरला.

 

 

 

त्यांना प्लॅन बी अवलंबण्याची गरज पडली नाही. दरम्यान, या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी सभागृहात केलेल्या गोंधळामुळे एकूण १४ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

 

 

दरम्यान संसदेत घुसखोरी केल्याच्या प्रकरणातील चार आरोपींना पटियाळा हाउस न्यायालयानं सात दिवसांची कोठडी सुनावली. सागर शर्मा, डी. मनोरंजन, अमोल शिंदे आणि नीलम आझाद अशी चार आरोपींची नावे आहेत. चौघांना पंधरा दिवसांची कोठडीची मागणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं केली होती.

 

 

मात्र, न्यायालयाने आरोपींना आठवडाभराची कोठडी सुनावली. मनोरंजन आणि सागर शर्मा यांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत उडी मारत ‘स्मोक कँडल’ द्वारे रंगीत वायू सोडला होता. संसदेबाहेरील परिवहन भवनसमोर नीलम आणि अमोल शिंदे यांनी घोषणाबाजी करत अशाच प्रकारचा वायू सोडला होता.

 

 

 

संसद भवन परिसरात येण्यापूर्वी हे लोक गुरुग्राममध्ये थांबले होते. या प्रकरणाचा सूत्रधार ललित झा नावाचा इसम, संसदेतील घुसखोरीमागे आणखी काही लोक असण्याची शक्यता आहे.

 

 

शिवाय दहशतवादी संघटना यामागे आहेत का? याचा तपास करणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोपींना पंधरा दिवसांची कोठडी दिली जावी, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली. संसदेत शिरून हल्ला करण्याचा कट नियोजनपूर्वक आखण्यात आला होता.

 

 

आरोपींकडून जी पत्रके जप्त करण्यात आली आहेत, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्ष्य असल्याचे म्हटले होते, असेही पोलिसांकडून युक्तिवादावेळी सांगण्यात आले.

 

 

सुनावणीवेळी आरोपींकडून एकही वकील हजर नव्हता. आरोपींवर गुन्हेगारी कट रचणे, घुसखोरी, दंगल होईल असे कृत्य करणे, सरकारी सेवेत बाधा आणणे यासह गैरकृत्य प्रतिबंधक कायद्यातील (यूएपीए) वेगवेगळी कलमे लावण्यात आली आहेत.

 

 

 

या हल्ल्याची तयारी सुमारे १८ महिन्यांपासून सुरू असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. हे हल्लेखोर विविध राज्यांतील असून ‘भगतसिंग फॅन क्लब’ या समाजमाध्यमवरील एका समूहाद्वारे परस्परांच्या संपर्कात आले आहेत.

 

 

या हल्ल्याच्या तयारीसाठी पहिली बैठक म्हैसूर येथे १८ महिन्यांपूर्वी घेण्यात आली होती. त्यानंतर या वर्षी मार्च महिन्यामध्ये चंडीगड येथे दुसरी बैठक घेण्यात आली.

 

 

या बैठकीमध्ये हल्ल्याचा कट आखण्यात आला. त्यानंतर आरोपी मनोरंजन याने संसदेत जाऊन पाहणी केली होती, असे पोलिस तपासातून उघड झाले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *