5 लाख लाडक्या बहिणींना फेब्रूवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळणार नाहीत ,पाहा काय आहे कारण ?

5 lakh beloved sisters are not getting Rs 1,500 per month in February, see what is the reason?

 

 

 

चारचाकी असल्यास लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. वाहनधारकांच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. आजपासून अंगणवाडी सेविका पडताळणी करणार.

 

मुंबईत लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे. 22 हजार महिलांना योजनेतून वगळलं. तर अर्जांच्या पडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये महिनाभरात 5 लाखांची घट झाली आहे.

 

राज्यातील ज्या ज्या महिलांच्या नावे चार, सहा, आठ, दहा, बारा चाकी वाहने आहेत, अशा जवळपास साडेआठ ते दहा लाख वाहनधारकांची जिल्हानिहाय याद्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.

 

त्या यादीतील महिलांच्या नावावरील वाहन सध्या त्यांच्याकडे आहे की नाही, याची पडताळणी आजपासून अंगणवाडी सेविका करणार आहेत. आठ दिवसांत पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा, असे आदेश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र व अपात्र असलेल्या लाभार्थीची पडताळणी करताना पहिल्यांदा चारचाकी वाहने असलेल्या महिलांची तपासणी केली जात आहे.

 

त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन आहे, अशांची पडताळणी होईल. त्यामुळे पुढील टप्प्यावर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सध्या चारचाकी वाहन ज्या महिलांच्या नावे आहेत, अशांची यादी जिल्हानिहाय पाठविण्यात आली आहे. त्याची पडताळणी आठ दिवसांत होऊन शासनाला अहवाल गेल्यावर योजनेतील किती लाभार्थी महिलांकडे वाहने आहेत हे स्पष्ट होणार आहे.

 

ती नावे योजनेतून वगळली जाणार आहेत. नियमात न बसणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

 

लाडकी बहिण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाखांची घट झाल्याची माहिती समोर आली. छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांमध्ये घट होतेय. डिसेंबरमध्ये 2 कोटी 46 लाख लाडकी बहिण लाभार्थी होते.

 

या संख्येत जानेवारी महिन्यात घट झाली. जानेवारीत हा आकडा 2 कोटी 41 लाखावर जाऊन पोहोचलाय. छाननीमध्ये अनेकांचे अर्ज बाद ठरले आहेत. लाडकी बहीण योजनावर नवीन तरतूद नाही, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या वक्तव्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *