अब्दुल सत्तार -सिरसाट यांच्यातील धुसफूस चव्हाट्यावर

The tussle between Abdul Sattar and Sirsat is on the rise.

 

 

 

महायुतीमध्ये आधीच तिन्ही पक्षांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर, शिवसेना शिंदे गटातही मंत्रीपद न मिळा्ल्याने काही आमदार नाराज आहेत.

 

तर, दुसरीकडे काही ठिकाणी पक्षांतर्गतच कुरघोडी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. एकाच पक्षाचे असूनही दोघांमध्ये वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि आजी पालकमंत्री संजय सिरसाट यांच्यातील संघर्ष संपता संपेना. दोघे एकाच पक्षाचे असूनही आधीच्या पालकमंत्र्यांच्या कामात अडथळे टाकण्याचे काम सुरू असल्याची चर्चा आहे.

 

आधीच्या पालकमंत्र्यांनी DPDC मध्ये जे निर्णय घेतले त्याची चौकशी करणार असे संजय सिरसाट यांनी जाहीर केले. त्यामुळे संजय सिरसाट आणि अब्दुल सत्तार यांना

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज देऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या नूतन वास्तू वरून दोघात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे बांधकाम अब्दुल सत्तार यांच्या निकटवर्तीय व्यक्तीला देण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

 

या इमारतीचा खर्च 37 कोटींवरून 92 कोटींवर कसा गेला, असा जाब संजय सिरसाट यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत विचारला आहे.

 

जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी मीना यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री संजय सिरसाट यांनी दिले. जिल्हा परिषद नूतन वास्तुचे बांधकाम अब्दुल सत्तार यांच्या जवळील व्यक्तीला दिले यावरून संजय शिरसाट खुन्नस काढत असल्याची चर्चा आहे.

 

वास्तविक या इमारतीचे मंजुरी काम सुरू झाले त्यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार नव्हते. तरीही संजय शिरसाट हे बांधकाम अब्दुल सत्तार

 

यांच्या मर्जीतील व्यक्तीला दिले म्हणून चौकशी करीत असल्याची चर्चा आता रंगायला लागली आहे. जिल्हा परिषद मुख्याधिकारी मीना यांनी खर्च का वाढला याचे स्पष्टीकरण दिले आहे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *