मुख्यमंत्री फडणवीसांचा पुन्हा एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला ब्रेक

Chief Minister Fadnavis again breaks Eknath Shinde's decision

 

 

 

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असताना त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या आणखी एका निर्णयाला फडणवीस सरकारकडून पुन्हा एकदा ब्रेक लावण्यात आला आहे.

 

शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या 3 हजार 200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

 

कामाचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला यांत्रिकी साफसफाईचे कंत्राट दिल्याचा ठपका ठेवत तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंतांवर आरोप करण्यात आले आहे.

 

दरम्यान, या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या अनियमिततेबद्दल कारवाई करण्यास सुरुवात केली असून शिंदे सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. तर काही निर्णय रद्द करण्यात येणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

 

शिंदे सरकारच्या कार्यकाळात तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री होते. त्यांच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या, अँब्युलन्स खरेदीसह हजारो कोटी रुपयांचे घोटाळे झाले होते.

 

आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे येथे बाह्य यंत्रणेद्वारे सफाई करण्याचा करार करण्यात आला होता.

 

यासाठी वार्षिक 638 कोटी रुपये तर 3 वर्षांसाठी एकूण 3, हजार 190 कोटी रुपयांचा ठेका पुण्यातील एका खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 रोजी देण्यात आला होता.

 

दरम्यान, आरोग्य विभागातील एकनाथ शिंदेंच्या याच निर्णयाला देवेंद्र फडणवीसांनी ब्रेक लगावला असल्याचे पहायला मिळाले आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या काळात जी कामे झाली ती काम झालीच नाही झाला तो केवळ भ्रष्टाचारच. शिंदेंच्या काळात आरोग्य मंत्री कोण होतं हे साऱ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या अल्प कार्यकाळात किती घोटाळे झाले हेही सर्वांना ठाऊक आहेत.

 

म्हणूनच भाजपकडून अशा भ्रष्ट मंत्र्यांना विरोध होता त्यातील ते एक आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याचा थेट जनतेशी संपर्क येतो.

 

मात्र त्या खात्यात भ्रष्टाचार होणार असेल तर ते कसलं खातं आणि कसलं राजकारण. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व थांबवत आहेत आणि पुढे ही थांबवणार असतील तर आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला हे जर जनतेसमोर आणणार असतील तर नक्की आम्ही त्यांचं स्वागत करू.

 

त्यांच्या प्रत्येक कृतीचा आम्ही स्वागतच करू. असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. ते नाशिक येथे बोलत होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *