उष्णतेची लाट ;महाराष्ट्रातील “या 5” जिल्ह्यांना यलो अलर्ट

Heat wave; Yellow alert for these 5 districts of Maharashtra

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा चटका अधिक जाणवू लागला आहे. फेब्रुवारी संपताच मार्चच्या सुरुवातीलाच तापमान झपाट्याने वाढू लागले आहे.

 

होळीच्या आधीच दुसरी उष्णतेची लाट आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण पट्ट्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे.

सोलापूर सर्वाधिक उष्णता;राज्यात अनेक ठिकाणी तापमान 36 अंश सेल्सियसच्या वर गेले आहे. सोलापूरात सर्वाधिक 38.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, येत्या पाच दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता असून येत्या काही दिवसांत पारा 41 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे.

 

 

उष्णतेची लाट कुठे अधिक?हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत तापमान 2 ते 4 अंशांनी वाढणार आहे.

 

1)कोकण आणि गोवा – उष्णतेच्या लाटेचा इशारा

2)मध्य महाराष्ट्रातील पाच जिल्हे – यलो अलर्ट जारी

3)मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग – 9 मार्च ते 11 मार्चपर्यंत विशेष अलर्ट

 

 

फेब्रुवारी महिना ठरला विक्रमी उष्ण!;यंदाचा फेब्रुवारी महिना सरासरीपेक्षा अधिक उष्ण ठरला आहे. देशातील सरासरी तापमान 27.58 अंश सेल्सियस असते,

 

मात्र यंदा ते 29.7 अंश सेल्सियस नोंदवले गेले. विशेष म्हणजे, 1901 पासून हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उष्ण फेब्रुवारी महिना ठरला आहे.

 

पुढील काही दिवस 11 मार्चपर्यंत उष्ण आणि दमट उष्णतेची लाट कायम राहणार असून, त्यानंतरही हवामान गरम आणि दमट राहील.

 

त्यामुळे नागरिकांनी थेट उन्हात जाण्याचे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून संरक्षण घ्यावे, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *