गोळीबारात मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याच्या भाच्याचा खून
Nephew of Union Minister in Modi government killed in firing

अंतर्गत कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबारात एका केंद्रीय मंत्र्याच्या भाच्याचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या भागलपुरमध्ये ही गोळीबाराची घटना घडली.
अंतर्गत वादातून झालेल्या या गोळीबारात केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या एका भाच्याचा मृत्यू झाला. दुसरा भाचा आणि बहिण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
नवगछियाच्या जगतपुर भागातील ही घटना आहे. दोन भाऊ आपसात भिडले. परस्परांवर गोळीबार केला. एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत.
मृताची ओळख पटली असून त्याचं नाव विश्वजीत आहे. जयजीत आणि त्याची आई मीना जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन भावांमध्ये गोळीबाराची ही घटना घडली. यात एका भावाचा मृत्यू झाला आहे. दुसरा जखमी आहे. मृत विश्वजीतच्या आईच्या हाताला गोळी लागली.
नळाच्या पाण्यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. जयजीतने गोळीबार केला. विश्वजीतचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. जयजीत गंभीररित्या जखमी झाला.
भाजपा एमएलसी डॉक्टर एनके यादव यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विश्वजीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नवगछियाचे एसपी प्रकरणाचा तपास करत आहेत.
हायप्रोफाईल प्रकरण असल्याने नातेवाईक प्रसारमाध्यमांना घरी येऊ देत नाहीयत. त्या सोबतच कुणीच काही बोलत नाही.
नवगछियाचे एसपी प्रेरणा कुमार यांनी सांगितलं की, जगतपुर गावात दोन भावंडांनी आपसात गोळीबार केल्याची माहिती मिळाली. परबत्ता SHO घटनास्थळी पोहोचले.
दोन्ही जखमींना रुग्णालयात हलवलं. एसडीपीओ सुद्धा रुग्णालयात गेले. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी आहे. या वादात त्यांच्या आईच्या हाताला गोळी लागली.
प्राथमिक तपासात नळावरुन भांडण झाल्याच समोर आलय, असं एसपी प्रेरणा कुमार यांनी सांगितलं. आम्ही सध्या जबानी नोंदवत आहोत. जबानीतून जी माहिती समोर येईल,
त्या आधारावर पुढची कारवाई होईल. घटनास्थळावर एक खोका आणि गोळी सापडली आहे. FSL टीम तपास करत आहे. पूर्ण रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई होईल.